सूर्यकुमार यादवने जाणीवपूर्वक अभिषेक शर्माला रन आऊट केलं? नेमकं खरं काय ते जाणून घ्या

आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यात महत्त्वाचा सामना होत आहे. या सामन्यातील विजयी संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव पुन्हा एकदाफेल गेला. पण त्याच्यावर अभिषेकला धावचीत केल्याचा आरोप होत आहे. नेमकं खरं काय ते जाणून घ्या

सूर्यकुमार यादवने जाणीवपूर्वक अभिषेक शर्माला रन आऊट केलं? नेमकं खरं काय ते जाणून घ्या
सूर्यकुमार यादवने जाणीवपूर्वक अभिषेक शर्माला रन आऊट केलं? नेमकं खरं काय ते जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 24, 2025 | 10:30 PM

आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि बांग्लादेश हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत स्थान पक्कं करणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात अपेक्षेप्रमाणे अभिषेक शर्माने सुरुवात करून दिली. त्याने आक्रमक खेळी करत 200हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 75 धावा केल्या. या सामन्यात आरामात शतक करेल असं वाटत होतं. पण धावचीत होत तंबूत परतावं लागलं. त्याची विकेट गेल्यानंतर आता सूर्यकुमार यादवला ट्रोल केलं जात आहे. अभिषेक शर्मा धावचीत सूर्यकुमार यादवमुळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अभिषेक शर्मा धावचीत झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिषेक शर्माची विकेट 12 व्या षटकात पडली. मुस्तफिझुर रहमानच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने कट शॉट खेळला. रिशाद हुसैनने डाव्या बाजूला उडी घेत चेंडू अडवला आणि गडबड झाली.

सूर्यकुमार यादवची चूक?

रिशाद हुसैनने फिल्डिंगमुळे एक धाव वाचली पण तिथपर्यंत अभिषेक शर्मा हाफ क्रीजपर्यंत आला होता. त्याला माहितीच नव्हतं की, बांगलादेशच्या खेळाडूच्या हातात चेंडू आहे. रिशादने तात्काळ नॉन स्ट्राईकला चेंडू फेकला आणि अभिषेक शर्मा धावचीत केलं. खरं तर सूर्यकुमार यादवची यात काहीच चूक नव्हती. कारण रिशाद असा पद्धतीने चेंडू अडवेल याची कल्पनाच नव्हती. त्याने चेंडू पकडल्याने सूर्याला क्रीज सोडण्याची संधीच मिळाली नाही.

सूर्यकुमार यादव देखील काही खास करू शकला नाही. अभिषेक शर्मानंतर तो देखील बाद झाला. त्याने 11 चेंडूत फक्त 5 धावा केल्या. मुस्तफिझुरच्या चेंडूवर बांगलादेशचा विकेटकीपर जाकीर अलीला झेल देत बाद झाला. एकाच षटकात दोन गडी बाद झाल्याने भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. सूर्यकुमार यादवचा सध्या बॅड पॅच सुरु आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलता आलं नव्हतं. आता बांगलादेशविरुद्ध पाच धावा केल्या. सूर्यकुमारचा सध्याचा फॉर्म पाहता जर कर्णधार नसता तर टीममध्ये जागा मिळवणं कठीण झालं असतं. अभिषेक शर्मा टिकला असता तर भारताची धावसंख्या 200 च्या आसपास गेली असती. पण भारताने 20 षटकात फक्त 168 धावा केल्या.