Video : हारिस रऊफ आणि अभिषेकच्या भांडणात अचानक झाली रिंकु सिंहची एन्ट्री, मैदानात केलं असं की…
भारत पाकिस्तान सामन्यातील हारिस रऊफ आणि अभिषेक शर्माच्या भांडणाचा व्हिडीओ सर्वांनीच पाहिला आहे. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रिंकु सिंहची एन्ट्री मैदानात झाली होती. तेव्हा काय झालं ते आता व्हायरल होत आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आल्यानंतर दोन्ही बाजूंनी खेळाडूंचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला बॅट आणि शाब्दिक मार दिला. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल हे पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटून पडले होते. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज पुरते हतबल झाले होते. त्यामुळे भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रऊफ यांच्यातील वादाचा नुकताच व्हायरल झाला होता. आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रिंकु सिंहची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच त्याने केलेल्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
हारिस रऊफने टाकत असलेल्या षटकात शुबमन गिलने चौकार मारला. त्यामुळे रऊफला राग अनावर झाला आणि गिलला काहीतरी पुटपुटत होता. त्यावेळी, नॉन-स्ट्रायकर एंडवर असलेल्या अभिषेक शर्माने ताबडतोब त्यात पडला आणि रऊफला चोख प्रत्युत्तर दिले. दोघांमधील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आणि ते एकमेकांच्या जवळ आले आणि वाद वाढला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंचांना हस्तक्षेप करावा लागला. हा वाद टेलिव्हिजनवर थोड्या वेळासाठी दाखवण्यात आला. त्यानंतर आलेल्या जाहिरातींमुळे पुढे काय झालं कळलं नाही. त्यानंतर काय झालं हा व्हिडीओ आता समोर येत आहे.
Full lafda live…
Haris Rauf’s lafda with Abhishek Sharma and Shubman Gill live…
Piche se humare 2 bande bhi aa gye thee Rinku Singh or Harshit Rana…
Rinku bhai ne matter sambhal liya. pic.twitter.com/eE8KaJDZNc
— AT10 (@Loyalsachfan10) September 23, 2025
सामन्यात ब्रेक झाल्यानंतर रिंकु सिंह आणि हार्षित राणा मैदानात धावत गेले. यावेळी पाकिस्तानी खेळाडू फलंदाजांना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. रिंकु सिंहच्या ही बाब लक्षात आली. रिंकु सिंह तात्काळ गिलकडे गेला आणि त्याला खेचून आणलं. त्यानंतर गिल आणि अभिषेक शर्माला काही तरी सूचना दिल्या. रिंकु सिंहच्या या कृतीचं कौतुक होत आहे. सामन्यानंतर घडलेल्या घटनेबद्दल अभिषेक शर्मा म्हणाला की पाकिस्तानी खेळाडू त्यांना विनाकारण चिथावण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणूनच त्यांना योग्य उत्तर दिले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीत पुन्हा लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुपर 4 फेरीतील समीकरण जुळून आलं तर दोन्ही संघ तिसऱ्यांना भिडतील.
