AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dilip Vengsarkar | ऋतुराज गायकवाडवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या वसीम जाफरला वेंगसरकरांच सडेतोड प्रत्युत्तर

Dilip Vengsarkar : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची मागच्या आठवड्यात निवड झाली. यात कसोटी संघाची निवड वादग्रस्त ठरली आहे. अनेकांनी टीम इंडियाच्या टेस्ट टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.

Dilip Vengsarkar | ऋतुराज गायकवाडवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या वसीम जाफरला वेंगसरकरांच सडेतोड प्रत्युत्तर
Dilip Vengsarkars-Ruturaj gaikwad-wasim Jaffer
| Updated on: Jun 27, 2023 | 2:41 PM
Share

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मागच्या आठवड्यात टीम इंडियाची निवड जाहीर झाली. कसोटी संघाच्या निवडीवर अनेक माजी क्रिकेटपटुंनी आक्षेप नोंदवले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील खराब प्रदर्शनामुळे चेतेश्वर पुजाराला टीममध्ये स्थान टिकवता आलं नाही. त्यानंतर अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी फेरनिवड. त्याने 16 महिन्यानंतर WTC फायनलसाठी निवडलेल्या टीममध्ये स्थान मिळवलं.

सर्फराज खान आणि अभिमन्यू ईश्वरन यांची टीममध्ये निवड न होणं हा तिसरा निर्णय वादग्रस्त ठरला. कारण देशांतर्गत आणि रणजी ट्रॉफीमध्ये दोघेही खोऱ्याने धावा करत आहेत. पण, तरीही निवड समितीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

दोन निवडीवर प्रश्नचिन्ह

आयपीएल 2023 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांची कसोटी संघात निवड झाली. या दोन निवडींवर काही माजी क्रिकेटपटुंना प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. दिलीप वेंगसरकर यांनी ऋतुराज गायकवाडच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. “फॉर्मेट कुठलाही असो, खेळाडूंवर दबाव सारखचा असतो. त्यांनी टीकाकारांना थोडं थांबण्याची विनंती केली आहे. टेस्ट फॉर्मेमध्ये गायकवाड कसा परफॉर्म करतो, ते पाहा” असं दिलीप वेंगसरकरांनी म्हटलय.

वसीम जाफर काय म्हणाले ?

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी ऋतुराज गायकवाडच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ईश्वरन आणि पांचाळला डावलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ऋतुराज गायकवाड झेप घेऊन टेस्ट टीममध्ये कसा आला? हा त्यांचा मुद्दा होता. आयपीएलमुळे हे सर्व झालं असं त्यांना म्हणायच होतं. त्यांनी टि्वट करुन ऋतुराज गायकवाडच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

दिलीप वेंगसरकर काय म्हणाले?

“रेड बॉल किंवा व्हाइट बॉल फरक पडत नाही. सगळच सारखं आहे. चांगला प्लेयर सगळ्याच फॉरमॅटमध्ये सामावला जातो. ऋतुराज कसा परफॉर्म करतो, ते पाहण्यासाठी आपल्याला थोंड थांबाव लागेल. आणि हा रांगेचा विषय काय आहे? मला समजत नाही. प्रत्येक प्लेयर दावेदार आहे” असं दिलीप वेंगसरकर म्हणाले. ऋतुराज गायकवाड मर्यादीत ओव्हरच्या क्रिकेटमध्ये खेळला आहे. अजून तो स्वत:च टीममध्ये पक्क स्थान निर्माण करु शकलेला नाही. गायकवाड टी 20 क्रिकेटसाठी जास्त ओळखला जातो. मुंबईच्या यशस्वी जैस्वालची सुद्धा टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान