Duleep Trophy 2026 अंतिम फेरीत तिलक वर्मा Vs इशान किशन, साउथ झोनने अशी जिंकली सेमीफायनल

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत साउथ झोन विरुद्ध ईस्ट झोन असा सामना होणार आहे. सेमीफायनलमध्ये साउथ झोनने नॉर्थ झोनला 7 गडी राखून नमवलं आणि अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात...

Duleep Trophy 2026 अंतिम फेरीत तिलक वर्मा Vs इशान किशन, साउथ झोनने अशी जिंकली सेमीफायनल
Duleep Trophy 2026 अंतिम फेरीत तिलक वर्मा Vs इशान किशन, साउथ झोनने अशी जिंकली सेमीफायनल
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 02, 2026 | 3:18 PM

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनने विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली होती. या सामन्यात ईस्ट झोनने सेंट्रल झोनचा 4 गडी राखून पराभव केला होती. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नॉर्थ झोन आणि साउथ झोन आमनेसामने होते. या सामन्यात तिलक वर्माच्या नेतृत्वात साऊथ झोनने बाजी मारली आणि अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात साउथ झोनने नॉर्थ झोनला 7 गडी राखून पराभूत केलं. आता अंतिम फेरीत ईस्ट झोन आणि साउथ झोन यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 6 सप्टेंबरला आहे. खऱ्या अर्थाने या सामन्यात कर्णधार इशान किशन विरुद्ध तिलक वर्मा अशी लढत पाहायला मिळणार आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात काय घडलं?

नॉर्थ झोनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण या सामन्यावर साउथ झोनने पकड मिळवली. नॉर्थ झोनचा पहिला डाव अवघ्या 195 धावांवर आटोपला. तर साउथ झोनने या धावांचा पाठलाग करताना धावांची 312 धावा केल्या आणि 117 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढण्याचं मोठं आव्हान नॉर्थ झोनपुढे होते. हे आव्हान मोडण्याचं आव्हान होतं. नॉर्थ झोनने 297 धावा केल्या आणि ईस्ट झोनसमोर विजयासाठी 180 धावांचं सोपं आव्हान दिलं. हे आव्हान साउथ झोनने 3 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला तो तिलक वर्मा… पहिल्या डावात त्याने 116 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात नाबाद 51 धावा करून विजय मिळवून दिला.

इशान किशन विरुद्ध तिलक वर्मा

अंतिम सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोन आणि तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील साउथ झोन आमनेसामने असतील. साउथ झोन हा दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील यशस्वी संघांपैकी एक आहे. आतापय्ंत 14 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर ईस्ट झोनने आतापर्यंत फक्त दोनदाच या स्पर्धेचं जेतेपद जिंकलं आहे. ईस्ट झोनने 2011-12 मधये आणि 2012-13 मध्ये सेंट्रल झोनला सलग दोनदा पराभूत करत जेतेपद मिळवलं होतं. आता 2012-13 च्या विजेतेपदानंतर ईस्ट झोनला एकदाही दुलीप ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 13 वर्षांनंतर त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इतकंच काय तर ईस्ट झोन आणि साउथ झोन पहिल्यांदाच अंतिम फेरीत भिडणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us