AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद

शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद

| Updated on: Sep 02, 2026 | 3:38 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी सुरू झाली असून, नीरज किशन कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे. कौल यांनी २०१८ च्या शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्यात अनेक पदाधिकारी लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नाहीत. निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा वापर योग्यच होता, असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी आपला युक्तिवाद मांडायला सुरुवात केली आहे. कौल यांनी विशेषतः २०१८ मध्ये शिवसेनेच्या संविधानामध्ये करण्यात आलेल्या बदलांवर जोरदार आक्षेप घेतला आहे. या बदलांनुसार पक्षात अनेक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, परंतु हे पदाधिकारी लोकशाही प्रक्रियेने निवडून आलेले नाहीत, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

१९९९ पासून निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षांना लोकशाहीवादी घटना स्वीकारण्याचे आणि घटनेनुसार निवडून आलेले प्रतिनिधी संघटनेत असावेत, असे पत्र लिहून सांगत आहे, असे कौल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. काही पक्ष हुकूमशाही पद्धतीने काम करतात, असेही त्यांनी म्हटले. शिवसेनेच्या २०१८ च्या घटनेमध्ये जे बदल झाले, ते लोकशाहीवादी नाहीत, असे कौल यांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर करून योग्य निर्णय घेतला आहे, कारण पक्ष आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करू शकला नाही, असा सवालही नीरज कौल यांनी केला.

Published on: Sep 02, 2026 03:28 PM

Follow Us