ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग….
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीत नीरज किशन कौल यांनी शिंदे गटाची बाजू मांडली. पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव, २०१०च्या घटनेतील त्रुटी आणि विरोधकांशी युती करण्याच्या निर्णयामुळे पक्षात उठाव झाल्याचे कौल यांनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरही त्यांनी भर दिला.
शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान नीरज किशन कौल यांनी शिंदे गटाकडून महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला. कौल यांनी म्हटले की, पक्षात एकाधिकारशाही होती, ज्यामुळे कोणीही आवाज उठवू शकत नव्हते आणि यामुळेच पक्षात मतभेद निर्माण झाले. त्यांच्या युक्तिवादानुसार, पक्षाची जी घटना निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती, ती नियमांनुसार नव्हती. तसेच, त्या घटनेत अनेक नियुक्त्या अशा लोकांच्या होत्या, जे निवडणुकीत निवडून आलेले नव्हते.
कौल यांनी भाजपसोबत निवडणुका लढवून नंतर वेगळा होण्याचा निर्णय आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या, त्यांच्यासोबत युती केल्यामुळे पक्षात उठाव झाल्याचे सांगितले. सुभाष देसाई प्रकरणात निवडणूक आयोगाने अधिकार वापरण्याबाबत स्पष्ट निर्देश आहेत, असेही कौल यांनी नमूद केले. पक्षाची घटना लोकशाहीवादी असावी, असे आयोग सांगत असून, आयोगाने कोणताही निर्णय एका रात्रीत घेतला नाही, तर बैठका घेऊन भूमिका जाणून घेतली, असे कौल यांनी स्पष्ट केले.
Published on: Sep 02, 2026 03:46 PM
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...

