AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs GT 2023 : SIX पडताच खवळला हार्दिक पंड्या, बोट दाखवून अफगाणी बॅट्समनला धमकावलं

KKR vs GT IPL 2023 : चालू सीजनमधील गुजरात टायटन्सचा आठ मॅचमधील सहावा विजय आहे. एकूण 12 पॉइंट्ससह हार्दिक पंड्याची टीम पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 पोजिशनवर आहे.

KKR vs GT 2023 : SIX पडताच खवळला हार्दिक पंड्या, बोट दाखवून अफगाणी बॅट्समनला धमकावलं
ipl 2023 hardik pandya kkr vs gtImage Credit source: twitter
| Updated on: May 01, 2023 | 10:56 AM
Share

कोलकाता : आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये शनिवारी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामना झाला. या मॅच दरम्यान गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या केकेआरचा ओपनर रहमानुल्लाह गुरबाजसोबत वाद घालताना दिसला. आयपीएलच्या या मॅचमध्ये गुजरात टायटन्सने केकेआरवर आरामात विजय मिळवला. पण हार्दिक आणि गुरबजामधील या वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

कोलकाताचा विकेटकीपर फलंदाज गुरबाजने इडन गार्डन्सवर तुफानी बॅटिंग केली. त्याने 39 चेंडूत 81 धावा फटकावल्या. गुरबाजने आपल्या इनिंगमध्ये सात सिक्स मारले. गुरबाजने हार्दिकच्या एका चेंडूवर सिक्स मारताच गुजरातचा कॅप्टन खवळला.

नेमकं काय झालं?

13 व्या ओव्हरमधील ही घटना आहे. अफगाणिस्तानचा 21 वर्षीय गुरबाज जोरदार बॅटिंग करत होता. त्याने गुजरातच्या बॉलर्सचा चांगलाचा समाचार घेतला. हार्दिक पंड्याच्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर त्याने सिक्स मारला. त्यानंतर हार्दिक चांगलाच संतापला. सिक्स मारल्यानंतर गुरबाज हसत होता आणि काही बोलला सुद्धा. हार्दिकला ती गोष्ट अजिबात आवडली नाही. पुढच्या चेंडूसाठी रनअप घ्यायला जात असताना, तो गुरबाजला बोट दाखवून काहीतरी सांगत होता.

जेसन रॉयच्या जागी मिळालेली संधी

गुरबाजला फॉर्ममध्ये असलेल्या जेसन रॉयच्या जागी टीममध्ये संधी मिळाली होती. त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. गुरबाजने 39 चेंडूत 81 धावा फटकावल्या. गुरबाजने आक्रमक बॅटिंग केली. त्यामुळे केकेआरने पहिली बॅटिंग करताना स्कोरबोर्डवर 179 धावा केल्या. गुजरातकडून विजय शंकरने अखेरीस 24 चेंडूत 51 धावा फटकावल्या. त्याआधी शुभमन गिल (49) आणि डेविड मिलर नाबाद (32) धावा यांनी विजयाची पायाभरणी केली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?