AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs GT Highlights : विजय शंकरची चाबूक बॅटिंग, 6,6,6,6,6 एकट्याने मॅच संपवली, KKR वर मोठा विजय

| Updated on: Apr 29, 2023 | 7:53 PM
Share

Kolkata Knight Riders vs Gujarat Titans IPL 2023 Live Score in Marathi: मागच्यावेळी गुजरात आणि कोलकाताची टीम आमने-सामने होती. त्यावेळी रिंकू सिंहच्या बळावर कोलकाताने हरलेली बाजी जिंकली होती.

KKR vs GT Highlights : विजय शंकरची चाबूक बॅटिंग, 6,6,6,6,6 एकट्याने मॅच संपवली, KKR वर मोठा विजय
KKR vs GT IPL 2023

कोलकाता : विजय शंकरच्या दमदार बॅटिंगच्या बळावर गुजरात टायटन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट आणि 13 चेंडू राखून मोठा विजय मिळवला. केकेआरच 180 धावांच टार्गेट गुजरातने 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. विजय शंकरने 24 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 2 फोर आणि 5 सिक्स आहे. दुसऱ्याबाजूने डेविड मिलरने त्याला साथ दिली. 18 चेंडूत नाबाद 32 धावा करताना मिलरने 2 फोर आणि 2 सिक्स मारल्या.

त्याआधी शुभमन गिलने गुजरातला चांगली सुरुवात दिली. शुभमन गिलची हाफ सेंच्युरी अवघ्या 1 रन्सने हुकली. सुनील नरेनच्या गोलंदाजीवर गिलने रसेलकडे झेल दिला. 35 चेंडूत 49 धावा करताना त्याने 8 चौकार मारले. हार्दिक पंड्याने 20 चेंडूत त्याने 26 धावा केल्या. त्याने 2 फोर, 1 सिक्स मारला.

दरम्यान केकेआरने रहमनुल्लाह गुरबाजच्या 39 चेंडूत (81) धावांच्या शानदार बॅटिंगच्या बळावर गुजरात टायटन्सला विजयासाठी 180 धावांच लक्ष्य दिलं होतं. केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 179/7 धावा केल्या होत्या. अखेरच्या ओव्हर्समध्ये आंद्रे रसेलने 19 चेंडूत 34 धावा केल्या. यात 2 फोर आणि 3 सिक्स होते.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Apr 2023 07:49 PM (IST)

    KKR vs GT Live Score : शंकरने 6,6,6,6,6 एकट्याने मॅच संपवली, KKR वर मोठा विजय

    विजय शंकरच्या दमदार बॅटिंगच्या बळावर गुजरात टायटन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट आणि 13 चेंडू राखून मोठा विजय मिळवला. केकेआरच 180 धावांच टार्गेट गुजरातने 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. विजय शंकरने 24 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 2 फोर आणि 5 सिक्स आहे. दुसऱ्याबाजूने डेविड मिलरने त्याला साथ दिली. 18 चेंडूत नाबाद 32 धावा करताना मिलरने 2 फोर आणि 2 सिक्स मारल्या.

  • 29 Apr 2023 07:41 PM (IST)

    KKR vs GT Live Score : विजय शंकरची चाबूक बॅटिंग 3 बॉल 3 SIX

    वरुण चक्रवर्तीने 17 वी ओव्हर टाकली. विजय शंकरने या ओव्हरमध्ये सलग 2 चेंडूवर 2 सिक्स मारले. 16 ओव्हरमध्ये गुजरातच्या 3 बाद 166 धावा झाल्या आहेत. डेविड मिलर 30 आणि विजय शंकर 40 धावांवर खेळतोय. या ओव्हरमध्ये 24 धावा वसूल केल्या.

  • 29 Apr 2023 07:37 PM (IST)

    KKR vs GT Live Score : 24 चेंडूत 38 धावांची गरज

    गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत 38 धावांची गरज आहे. 16 ओव्हरमध्ये गुजरातच्या 3 बाद 142 धावा झाल्या आहेत. डेविड मिलर 29 आणि विजय शंकर 21 धावांवर खेळतोय.

  • 29 Apr 2023 07:31 PM (IST)

    KKR vs GT Live Score : 6,6,4 गुजरातला मिळाली मोठी ओव्हर

    गुजरातला एका मोठ्या ओव्हरची गरज होती. सुयश शर्माच्या गोलंदाजीवर गुजरातने 18 धावा वसूल केल्या. 15 ओव्हर अखेरीस गुजरातच्या 3 बाद 129 धावा झाल्या आहेत. डेविड मिलर 13 बॉल 26 आणि विजय शंकर 12 बॉलमध्ये 12 धावांवर खेळतोय.

  • 29 Apr 2023 07:12 PM (IST)

    KKR vs GT Live Score : अरेरे, शुभमन गिलची हाफ सेंच्युरी अवघ्या 1 रन्सने हुकली

    अरेरे, शुभमन गिलची हाफ सेंच्युरी अवघ्या 1 रन्सने हुकली. सुनील नरेनच्या गोलंदाजीवर गिलने रसेलकडे झेल दिला. 35 चेंडूत 49 धावा करताना त्याने 8 चौकार मारले.

  • 29 Apr 2023 07:09 PM (IST)

    KKR vs GT Live Score : हार्दिक पंड्या बाद

    हार्दिक पंड्या आऊट झाला. 20 चेंडूत त्याने 26 धावा केल्या. त्याने 2 फोर, 1 सिक्स मारला. गुजरातची दुसरी विकेट गेली आहे. गुजरातच्या 11 ओव्हर अखेरीस 92/2 धावा झाल्या आहेत. हार्दिक हार्षित राणाच्या गोलंदाजीवर LBW आऊट झाला.

  • 29 Apr 2023 07:02 PM (IST)

    KKR vs GT Live Score : हार्दिक पंड्याचा कडक सिक्स

    10 ओव्हर्समध्ये गुजरातच्या एक बाद 89 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 33 चेंडूत 48 आणि कॅप्टन हार्दिक 17 चेंडूत 25 धावांवर खेळतोय.

  • 29 Apr 2023 06:52 PM (IST)

    KKR vs GT Live Score : गिल-हार्दिकची जोडी जमली

    8 ओव्हर्समध्ये गुजरातच्या एक बाद 70 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 28 चेंडूत 44 आणि कॅप्टन हार्दिक 10 धावांवर खेळतोय.

  • 29 Apr 2023 06:45 PM (IST)

    KKR vs GT Live Score : पावरप्लेच्या 6 ओव्हर पूर्ण

    पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये गुजरातच्या एक बाद 52 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 20 चेंडूत 35 आणि कॅप्टन हार्दिक 5 धावांवर खेळतोय.

  • 29 Apr 2023 06:40 PM (IST)

    KKR vs GT Live Score : गुजरातची पहिली विकेट

    चांगल्या सुरुवातीनंतर वृद्धीमान साहाच्या रुपाने गुजरातला पहिला धक्का बसला आहे. आंद्रे रसेलने साहाला हर्षित राणाकरवी 10 धावांवर झेलबाद केलं. 5 ओव्हर अखेरीस गुजरातच्या 1 बाद 47 धावा झाल्या आहेत. ओपनर शुभमन गिल 17 चेंडूत 30 धावांवर खेळतोय. त्याने 6 चौकार मारले.

  • 29 Apr 2023 06:01 PM (IST)

    KKR vs GT Live Score : गुजरातला विजयासाठी इतक्या धावांच टार्गेट

    रहमनुल्लाह गुरबाजच्या 39 चेंडूत (81) धावांच्या शानदार बॅटिंगच्या बळावर केकेआरने गुजरात टायटन्सला विजयासाठी 180 धावांच लक्ष्य दिलं आहे. केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 179/7 धावा केल्या. अखेरच्या ओव्हर्समध्ये आंद्रे रसेलने 19 चेंडूत 34 धावा केल्या. यात 2 फोर आणि 3 सिक्स आहेत.

  • 29 Apr 2023 05:50 PM (IST)

    KKR vs GT Live Score : रिंकू सिंहचा फ्लॉप शो

    मागच्या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करणारा रिंकू सिंह आज फ्लॉप ठरला. तो 20 चेंडूत 19 रन्सवर आऊट झाला. रिंकूने आज फक्त 1 सिक्स मारला. नूर अहमदच्या गोलंदाजीवर लिटिलने रिंकूची कॅच घेतली. 18 ओव्हर अखेरीस केकेआरच्या 156 धावा झाल्या आहेत.

  • 29 Apr 2023 05:45 PM (IST)

    KKR vs GT Live Score : धोकादायक गुरबाज पॅव्हेलियनमध्ये

    16 ओव्हर अखेरीस केकेआरच्या 5 बाद 137 धावा झाल्या आहेत. याच ओव्हरमध्ये धोकादायक गुरबाज 81 रन्सवर आऊट झाला. त्याने 39 चेंडूत 81 धावा केल्या. नूर अहमदच्या गोलंदाजीवर राशिद खानने त्याचा झेल घेतला. त्याने 5 फोर, 7 सिक्स मारले.

  • 29 Apr 2023 05:24 PM (IST)

    KKR vs GT Live Score : गुरबाजचा SIX, केकेआरची धावसंख्या 100 च्या पुढे

    रहमनुल्लाह गुरबाजने सिक्स मारुन केकेआरच धावांच शतक पूर्ण केलं. 13 ओव्हर अखेरीस केकेआरची स्थिती 105/4 अशी आहे. गुरबाज 33 चेंडूत 67 धावांवर खेळतोय. त्याला रिंकू सिंह साथ देतोय.

  • 29 Apr 2023 05:15 PM (IST)

    KKR vs GT Live Score : एकाच ओव्हरमध्ये केकेआरच्या दोन मोठ्या विकेट

    एकाच ओव्हरमध्ये केकेआरच्या दोन विकेट गेल्या आहेत. 11 व्या ओव्हरमध्ये आधी वेंकटेश अय्यरच्या रुपाने केकेआरला तिसरा धक्का बसला. त्याने 14 चेंडूत (11) धावा केल्या. जोश लिटिलने त्याला LBW बाद केलं. त्यानंतर कॅप्टन नितीश राणाला (4) लिटिलने तेवतियाकरवी झेलबाद केलं. 11 ओव्हर अखेरीस केकेआरची 88 /4 स्थिती आहे.

  • 29 Apr 2023 05:01 PM (IST)

    KKR vs GT Live Score : आक्रमक खेळणाऱ्या गुरबाची हाफ सेंच्युरी

    9 ओव्हरमध्ये केकेआरच्या 2 बाद 80 धावा झाल्या आहेत. रहमनुल्लाह गुरबाज (51) आणि वेंकटेश अय्यरची (9) जोडी मैदानात आहे. गुरबाजने 27 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवताना 4 फोर आणि 4 सिक्स मारले.

  • 29 Apr 2023 04:49 PM (IST)

    KKR vs GT,Live Score : पावरप्लेमध्ये केकेआरच्या दमदार धावा

    पावरप्लेमध्ये केकेआरच्या 61/2 धावा झाल्या आहेत. रहमनुल्लाह गुरबाज गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करतोय. त्याने 15 चेंडूत नाबाद 39 धावा करताना 2 फोर आणि 4 सिक्स मारले आहेत. वेंकटेश अय्यर आता मैदानात आला आहे.

  • 29 Apr 2023 04:46 PM (IST)

    KKR vs GT,Live Score : शार्दुल ठाकूर OUT

    शार्दुल ठाकरुच्या रुपाने केकेआरचा दुसरा विकेट गेला आहे. त्याला भोपळाही फोडता आला नाही. शमीच्या गोलंदाजीवर मोहित शर्माने शार्दुलची पळत जाऊन जबरदस्त कॅच पकडली.

  • 29 Apr 2023 04:32 PM (IST)

    KKR vs GT Live Score : केकेआरला पहिला झटका

    मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर नारायण जगदीशन (19) LBW आऊट झाला. त्याने 15 चेंडूत 19 धावा करताना 4 चौकार लगावले. 3 ओव्हरमध्ये केकेआरच्या 23/1 धावा झाल्या आहेत.

  • 29 Apr 2023 04:25 PM (IST)

    KKR vs GT,Live Score : दोन ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    केकेआरने दोन ओव्हरमध्ये बिनबाद 16 धावा केल्या आहेत. नारायण जगदीशन (13) आणि रहमनुल्लाह गुरबजाज (2) रन्सवर खेळतोय.

  • 29 Apr 2023 03:51 PM (IST)

    KKR vs GT Live Score: केकेआरची प्लेइंग इलेव्हन

    रहमनुल्लाह गुरबाज, एन जगदीशन, वेंकटेश अय्यर, नीतीश राणा (कॅप्टन), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेविड विस, शार्दुल ठाकुर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

  • 29 Apr 2023 03:50 PM (IST)

    KKR vs GT Live Score: गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन

    ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेविड मिलर, अभिनव मनोहर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जॉश लिटिल, नूर अहमद

  • 29 Apr 2023 03:48 PM (IST)

    KKR vs GT,Live Score : उशिराने सुरु होणार सामना

    टॉस नंतर कोलकाता येथे मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे सामना उशिराने सुरु होणार आहे. सध्या पाऊस थांबलाय. पण आकाशात अजूनही काळे ढग आहेत.

  • 29 Apr 2023 03:14 PM (IST)

    KKR vs GT Live Score : आज रिंकू सिंहवर सगळ्यांच्या नजरा

    मागच्या सामन्यात केकेआरने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. रिंकू सिंहने लास्ट ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 5 सिक्स मारुन मॅच फिरवली होती.

  • 29 Apr 2023 03:05 PM (IST)

    IPL 2023 KKR vs GT Live Score : कोणी जिंकला टॉस?

    कोलकाताच्या इडन गार्डन्सवर आजचा सामना होत असून गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकला असून त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

Published On - Apr 29,2023 3:03 PM

Follow us
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.