ENG vs AUS: टी20i-वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम जाहीर, 5 युवांना संधी-3 अनुभवी खेळाडूंना डच्चू
Australia Tour Of England 2024: ऑस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 2 मालिकांमध्ये 8 सामने खेळणार आहे. इंग्लंडने मायदेशातील या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट टीम सप्टेंबर महिन्यात स्कॉटलँड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड विरुद्ध टी20i सीरिज खेळणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. टी 20i मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर एकदिवसीय मालिका ही एकूण 5 सामन्यांची असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या मायदेशातील दोन्ही मालिकांसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. जॉस बटलर हा या दोन्ही मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.
5 जणांची पहिल्यांदाच निवड, तिघांना डच्चू
ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही टी 20i मालिकेने होणार आहे. त्यानंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने टी 20i सीरिजसाठी 15 सदस्यीय संघात 5 युवा खेळाडूंची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. यामध्ये जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल, डॅन मौसली, जोश हल आणि जॉन टर्नरचा समावेश आहे. तसेच ब्रायडन कार्स याचं कमबॅक झालं आहे. ब्रायडन कार्स याचं 3 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. तर जॉनी बेयरस्टो, मोईन अली आणि ख्रिस जॉर्डन या तिघांना दोन्ही मालिकांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हे तिघेही नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कप संघात होते. जॉर्डनने यूएएस विरुद्ध हॅटट्रिकही घेतली होती.
- इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टी20i सीरिज
- पहिला सामना, 11 सप्टेंबर, साउथम्पटन, द रोज बॉल
- दुसरा सामना, 13 सप्टेंबर, कार्डिफ, सोफिया गार्डन्स
- तिसरा सामना, 15 सप्टेंबर, मॅन्चेस्टर, ओल्ड ट्रॅफर्ड
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज
पहिला सामना, 19 सप्टेंबर, नॉटिंगघम, ट्रेन्ट ब्रिज
दुसरा सामना, 21 सप्टेंबर, लीड्स, हेडिंग्ले
तिसरा सामना, 24 सप्टेंबर, चेस्टर ली स्ट्रीट, रिवरसाईड ग्राउंड
चौथा सामना, 27 सप्टेंबर, लंडन, लॉर्ड्स
पाचवा सामना, 29 सप्टेंबर, ब्रिस्टॉल, काउंटी ग्राउंड
टी20i आणि वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम
Who are you excited to see? 😃
A super September in store! 🏏💥
🏴 #ENGvAUS 🇦🇺 #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) August 26, 2024
टी 20i मालिकेसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम कुरन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली आणि जॉन टर्नर.
इंग्लंड विरूद्धच्या टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ: मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, रिले मेरेडिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, रीस टोपली आणि जॉन टर्नर.
