AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs AFG Toss | इंग्लंडने अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकला, अशी आहे प्लेईंग ईलेव्हन

England vs Afghanistan Toss | अफगाणिस्तान क्रिकेट टीमसमोर गत वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड क्रिकेट टीमचं आव्हान आहे. इंग्लंडनं अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलंय. आता अफगाणिस्तान किती धावा करतं हे पाहावं लागेल.

ENG vs AFG Toss | इंग्लंडने अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकला, अशी आहे प्लेईंग ईलेव्हन
| Updated on: Oct 15, 2023 | 2:16 PM
Share

नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 13 वा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस झाला. इंग्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन जॉस बटलर याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे इंग्लंड अफगाणिस्तानला रोखण्यात यशस्वी होते की अफगाणिस्तान पूर्ण 50 ओव्हर खेळून काढते हे पाहावं लागेल.

अफगाणिस्तानसमोर इंग्लंडचं आव्हान

अफगाणिस्तानसमोर इंग्लंडचं तगडं आव्हान आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानने प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. नजीबुल्लाह झद्रान याच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये इक्रम अलीखिल याचा समावेश करण्यात आला आहे. तर इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

पॉइंट्सटेबलमध्ये कोण कुठे?

इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील तिसरा सामना आहे. इंग्लंडने याआधी खेळलेल्या 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एकदा पराभव झाला आहे. इंग्लंड पॉइंट्स टेबलमध्ये 2 पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तानला खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आलंय. अफगाणिस्तान पॉइंट्स टेबलमध्ये झिरो पॉइंट्ससह शेवटच्या म्हणजे 10 व्या क्रमांकावर आहे.

इंग्लंड विरुद्ध अफागाणिस्तान आमनेसामने

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.