ENG vs IND : टीम इंडियाने मोठी संधी गमावली, काही मिनिटांत गेम बदलला, इंग्लंडचं कमबॅक

England vs India 1st Test : भारतीय क्रिकेट संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्रात जोरदार सुरुवात केली. मात्र अखेरच्या क्षणी टीम इंडियाने मोठी चूक केली. जाणून घ्या.

ENG vs IND : टीम इंडियाने मोठी संधी गमावली, काही मिनिटांत गेम बदलला, इंग्लंडचं कमबॅक
Eng vs Ind 1st Test
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 20, 2025 | 6:23 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा हेडिंग्ले लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या नव्या सलामी जोडीने अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा शानदार पद्धतीने सामना केला. त्यामुळे पहिलं सत्र टीम इंडियाच्याच नावावर होणार, अशी शाश्वती चाहत्यांना होती. मात्र शेवटच्या काही चेंडूत इंग्लंडने कमबॅक केलं. इंग्लंडने टीम इंडियाला झटपट 2 झटके दिले आणि पहिलं सत्र बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने अशाप्रकारे पहिलं सत्र आपल्या नावावर करण्याची संधी काही चेंडूंनी गमावली.

टीम इंडियाची कडक सुरुवात

यशस्वी आणि केएल या दोघांनी भारताला संयमी आणि अप्रतिम सुरुवात करुन दिली. केएल राहुल याने जोश टंग याच्या बॉलिंगवर 15 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा घेतल्या. यासह केएल आणि यशस्वी या जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. टीम इंडिया यासह 39 वर्षांनंतर हेडिंग्लेमध्ये अर्धशतकी सलामी भागीदारी करण्यात यशस्वी ठरली. दोघेही संयमीपणे कोणतीही घाईगडबड न करता खेळत होते. पहिल्या सत्राचा खेळ संपायला काही वेळच बाकी होता. केएल आणि यशस्वी दोघेही खेळत होते. त्यामुळे टीम इंडियाची ही सलामी जोडी नाबाद परतेल, असं वाटत होतं. मात्र इथेच गेम फिरला.

बार्यडन कार्स याने ही सेट जोडी फोडली आणि टीम इंडियाला पहिला झटका दिला. कार्सने 25 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर केएल राहुल याला आऊट केलं. केएल ऑफ स्टंपबाहेरील बॉल खेळण्यात अपयशी ठरला आणि स्लिपमध्ये कॅच आऊट झाला. केएलने 78 बॉलमध्ये 42 रन्स करुन आऊट झाला.

त्यानंतर पुढील पाचव्याच बॉलवर इंग्लंडने दुसरा झटका दिला. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने डेब्यूटंट साई सुदर्शन याला भोपळाही फोडू दिला नाही. स्टोक्सने साईला झिरोवर जेमी स्मिथ याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची 25.4 ओव्हरनंतर अशी 92 आऊट 2 अशी स्थिती झाली. साई आऊट होताच लंचब्रेक जाहीर करण्यात आला. तर यशस्वी जयस्वाल 74 बॉलमध्ये 42 रन्सवर नॉट आऊट परतला. यशस्वीने या खेळीत 8 चौकार लगावले. आता लंचनंतर यशस्वीसह कॅप्टन मैदानात येणार आहे. त्यामुळे या जोडीवर टीम इंडियाला भक्कम भागीदारी करुन देण्याची जबाबदारी असणार आहे.