ENG vs IND : यशस्वी जैस्वालकडून घोडचूक, तब्बल 3 कॅचेस सोडल्या, इंग्लंडला 108 धावांचा फायदा
Yashasvi jaiswal Dropped 3 Catches : टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात एकूण 4 खेळाडूंनी 6 कॅचेस सोडल्या. त्यापैकी एकट्या यशस्वी जैस्वाल याने 3 कॅच सोडल्या. त्यामुळे भारताला 100 पेक्षा अधिक धावांचा फटका बसला आहे.

कॅचेस विन मॅचेस असं कायम म्हटलं जातं. एखाद्या संघाला विजय मिळवायचा असेल तर बॅटिंग, बॉलिंगसह दमदार फिल्डिंगही करावी लागते. टीम इंडियाच्या फिल्डिंगचा स्तर गेल्या काही वर्षात उंचावला आहे. मात्र हेडिंग्ले लीड्समध्ये टीम इंडियाच्या 4 खेळाडूंनी इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात गचाळ फिल्डिंग केली. त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाने पहिल्या डावात 471 धावा केल्या. तर इंग्लंडने प्रत्युत्तरात 465 रन्स केल्या. टीम इंडियाच्या 4 खेळाडूंनी सोडलेल्या कॅचमुळे भारताला फक्त 6 धावांची नाममात्र आघाडी घेता आली.
टीम इंडियाच्या चौघांनी इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात एकूण 6 कॅच सोडल्या. त्यापैकी सर्वाधिक 3 कॅचेस या एकटच्या यशस्वी जैस्वाल याने सोडल्या. यशस्वीने पहिल्या डावात 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. मात्र यशस्वीला बॅटिंगनंतर फिल्डिंगमध्ये तशीच कामगिरी करता आली नाही. यशस्वी स्लीपमधील पट्टीचा फिल्डर आहे. मात्र यशस्वीने पहिल्या कसोटीत त्याच्या या ओळखीला छेद दिला. यशस्वीने सोडलेल्या 3 कॅचेसमुळे टीम इंडियालाही मोठं नुकसान सहन करावं लागलं.
यशस्वीकडून 3 कॅच ड्रॉप
लीड्समध्ये टीम इंडियाकडून यशस्वी व्यतिरिक्त कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या दोघांनीही शतक केलं. त्यामुळे भारताने 471 धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजांनंतर गोलंदाजांकडूनही अशीच कामगिरी अपेक्षित होती. मात्र खेळाडूंनी फिल्डिंगद्वारे गोलंदाजांना चांगली साथ दिली नाही. यशस्वीने सोडलेल्या 3 कॅचमुळे टीम इंडिया मोठी आघाडी मिळवण्यापासून वंचित राहिली.
यशस्वी याने दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा ओपनर बेन डकेट याचा सोपा कॅच सोडला. डकेट तेव्हा 15 धावांवर खेळत होता. डकेटने या संधीचा फायदा घेत अर्धशतकी खेळी केली. डकेटने 62 धावा केल्या.
यशस्वी अपयशी
Yashasvi Jaiswal scores 💯, but also helps the opposition players score 💯 by dropping multiple catches.
Catches by Jaiswal in last 3 Test Sseries- Taken : 7 Dropped : 12 #ENGvsIND https://t.co/dpbL3XJsqv pic.twitter.com/XKBvrsZM1n
— Dr. Kamal Suryom (@K_Suryom) June 22, 2025
त्यानंतर यशस्वीने जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर स्लिपमध्ये ओली पोप याचा कॅच सोडला. पोप तेव्हा 62 धावांवर खेळत होता. पोपने या संधीचा फायदा घेतला आणि शतक केलं. पोपने 106 रन्स केल्या. त्यानंतर यशस्वीने तिसऱ्या दिवशी तिसरा कॅच सोडला. यशस्वीने हॅरी ब्रूक याचा 82 धावांवर कॅच सोडला. हॅरीने 99 धावा केल्या. अशाप्रकारे यशस्वीने सोडलेल्या 3 कॅचमुळे भारताला तब्बल 108 धावांचं नुकसान झालं. अर्थात यशस्वीने पहिल्या डावात जितक्या धावा केल्या त्यापेक्षा अधिक धावांचं नुकसान भारताला त्याच्या 3 चुकांमुळे झालं.