
इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी टीम इंडिया बॅकफुटवर होती. मात्र भारताने दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने 4-4 झटके दिले. त्यामुळे इंग्लंडला फक्त 224 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात फक्त 23 धावांचीच आघाडी घेता आली. त्यानंतर भारताने दुसर्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 52 धावांची आघाडी घेतली. भारताने केएल राहुल आणि साई सुदर्शन यांच्या रुपात 2 विकेट्स गमावल्या. तर यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप ही जोडी नाबाद परतली.
भारतासाठी तिसऱ्या दिवसातील (2 ऑगस्ट) पहिला तास फार आव्हानात्मक ठरणार होता. मात्र यशस्वी जैस्वाल आणि नाईट वॉचमॅन आकाश दीप या जोडीने हा तास हुशारीने खेळून काढला. इतकंच नाही तर या दोघांनी या दरम्यान वेगाने धावाही केल्या. तसेच आकाश दीप याने या दरम्यान फलंदाजांना लाजवेल अशी खेळी केली आणि खणखणीत अर्धशतक झळकावलं.
आकाशने भारताच्या डावातील 38 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं. आकाशने 72.86 च्या स्ट्राईक रेटने 9 चौकारांसह हे अर्धशतक ठोकलं. आकाशच्या या खेळीनंतर ड्रेसिंग रुममधील भारतीय खेळाडूंनी उभ राहून त्याच्या या खेळीचं कौतुक केलं. इतकंच काय तर कायम गंभीर मुद्रेत असणारे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे देखील आकाशच्या शतकानंतर आनंदी झाले.
आकाश दीपचं कडकडीत अर्धशतक
Words fall short for a memorable knock! 👏🏻#TeamIndia‘s nightwatchman, #AkashDeep raises his first-ever Test fifty & the timing couldn’t be better! 🙌🏻🇮🇳#ENGvIND 👉 5th TEST, DAY 3 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/3V6YCy3sHy pic.twitter.com/QPlnTUA5wy
— Star Sports (@StarSportsIndia) August 2, 2025
भारताने दुसऱ्या दिवशी 70 धावांवर आकाश दीप याच्या रुपात दुसरी विकेट गमावली. त्यानंतर आकाश दीपला नाईट वॉचमॅन म्हणून पाठवण्यात आलं. हा निर्णय चाहत्यांना काही पटला नाही. काही षटकानंतर दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवशी यशस्वी आणि आकाशने संयमी सुरुवात केली. या दरम्यान आकाशने संधी मिळेल तेव्हा फटके मारले. तसेच आकाशने या दरम्या एकेरी-दुहेरी धावा घेत स्ट्राईकही बदलली. आकाशने अशाप्रकार अविस्मरणीय असं अर्धशतक केलं.
आकाशला शतकाची संधी होती. आकाशने अर्धशतकानंतर गिअर बदलला. आकाशने काही मोठे फटके मारले. त्यामुळे आकाश सहज शतक करेल, असं वाटत होतं. मात्र विकेटच्या शोधात असलेल्या इंग्लंडची प्रतिक्षा अखेर संपली. जेमी ओव्हरटन याने 43 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर आकाशला गस एटकीन्सन याच्या हाती कॅच आऊट केलं. आकाशने 94 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या.