ENG vs NZ, kane williamson : केन विल्यमसनची कोरोनावर मात, तरीही यूझीलंडच्या अडचणी संपेना!

| Updated on: Jun 16, 2022 | 8:28 AM

विल्यमसनननं कोरोनावर मात करून पुनरागमन केलं असलं तरी संघातील कोरोनाचा कहर अद्याप थांबलेला नाही.

ENG vs NZ, kane williamson : केन विल्यमसनची कोरोनावर मात, तरीही यूझीलंडच्या अडचणी संपेना!
Kane Williamson
Image Credit source: icc
Follow us on

नवी दिल्ली : न्यूझीलंडचा (NZ) कर्णधार केन विल्यमसन (kane williamson) यानं कोरोनावर (Corona) मात केली आहे. त्यानंतर तो पुन्हा संघात सहभागी झाला आहे. दुसऱ्या कसोटीच्या एक दिवस अगोदर तो या कोरोना मुक्त झाला. यावेळी केननं कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.  नियमांनुसार त्याला पाच दिवस क्वारंटाईनमध्ये राहावं लागलं. यामुळे तो इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटी खेळू शकला नाही. पण तिसर्‍या आणि अंतिम कसोटीपूर्वी केन विल्यमसनचा संघात सहभागी होणं ही न्यूझीलंडसाठी दिलासादायक बातमी आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमनं किवीजचे नेतृत्व केलं. इंग्लंडने मालिकेपूर्वी दोन सामने जिंकून संघावर अभेद्य आघाडी घेतली आहे. केन विल्यमसनच्या संघात सामील झाल्याची बातमी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिलीय. संघाचा एक व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं की, ‘कोरोनामधून बरा होऊन आणि आयसोलेशन पूर्ण करून पुन्हा कसोटी संघात सहभागी झालेल्या कर्णधार केन विल्यमसनचे स्वागत आहे. तिसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी रविवारी लीड्सला रवाना होण्यापूर्वी संघाकडे काही दिवसांची विश्रांती आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचं ट्विट

कोरोनाचा कहर कायम

विल्यमसनननं कोरोनावर मात करून पुनरागमन केलं असलं तरी संघातील कोरोनाचा कहर अद्याप थांबलेला नाही. हेडिंग्ले टेस्टनंतर मायकेल ब्रेसवेल याला कोरोना झाला होता,. तर फिजिओ विजय वल्लभ आणि स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच ख्रिस डोनाल्डसन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

अटी मात्र कायम

कोरोनामुळे मागची दोन वर्ष टीम इंडियाच्या सगळ्या सीरिज आणि आयपीएल बायो-बबलमध्ये खेळवली गेली. पण आता बायो-बबल नसल्यामुळे खेळाडूंना थोडाफार दिलासा मिळाला आहे. सीरिज बायो-बबलमध्ये नसली तरी खेळाडूंना जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्याची आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही.

शेवटचा सामना 23 जूनपासून

पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला इंग्लंडकडून 5-5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.नॉटिंगहॅम कसोटीत किवींनी इंग्लंडसमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. जे जॉनी बेअरस्टोच्या झंझावाती खेळीच्या जोरावर यजमानांनी अखेरच्या दिवशी पूर्ण केले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 जूनपासून लीड्समध्ये खेळवला जाणार आहे.