AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan on IPL : आयपीएल रोखण्याचा पाकिस्तानचा डाव, इतर क्रिकेट बोर्डाचं डोकं भडकावण्याचे प्रयत्न, नेमकं काय झालं? जाणून घ्या…

2024 ते 2031 पर्यंतच्या FTP सायकलमध्ये IPL साठी अडीच महिन्यांचा कालावधी असेल. यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्याचं दिसतंय

Pakistan on IPL : आयपीएल रोखण्याचा पाकिस्तानचा डाव, इतर क्रिकेट बोर्डाचं डोकं भडकावण्याचे प्रयत्न, नेमकं काय झालं? जाणून घ्या...
Pakistan on IPL
| Updated on: Jun 16, 2022 | 7:53 AM
Share

नवी दिल्ली : एकीकडे शेजारील राष्ट्र चीनच्या (China) कुरापती थांबता थांबत नाही. भारतात सतत घुसखोरी नाहीतर ‘ग्लोबल टाईम्स’मधून गरळ ओकण्याचं काम केलं जातं. त्यातच आता स्वत: देशातील वातावरण अस्थिर झालेलं असताना देखील पाकिस्तानकडून (Pakistan) आयपीएलला (IPL) रोखण्याचे नाकाम प्रयत्न सुरू असल्याचं समोर आलंय. यात धक्कादायक माहिती ही आहे की, या पाकिस्ताननं इतर क्रिकेट बोर्डाचं देखील भारताविरोधात डोकं भडकवायला सुरुवात केली आहे. आयसीसीच्या फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) कॅलेंडरमध्ये आयपीएलला अडीच महिन्यांची विंडो देण्याच्या प्रस्तावावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) उर्वरित बोर्डाशी बोलणार आहे. त्याचा अनेक आंतरराष्ट्रीय मालिकांवर विपरीत परिणाम होईल, असं पीसीबीचं मत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं होतं की 2024 ते 2031 पर्यंतच्या FTP सायकलमध्ये IPL साठी अडीच महिन्यांचा कालावधी असेल. यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्याचं दिसतंय.

जय शाह नेमकं काय म्हणाले?

बीसीसीआय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह म्हणाले की, ‘पुढील एफटीपी सायकलपासून, आयपीएलसाठी अडीच महिन्यांची एक विंडो असेल जेणेकरून सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू त्यामध्ये खेळू शकतील. आम्ही इतर मंडळांशी आणि आयसीसीशीही याबाबत चर्चा केली आहे. पीसीबीचं असं मत आहे की या प्रकरणावर चर्चा होणं आवश्यक आहे.

पीसीबीचं काय मत?

पीसीबीच्या एका सूत्राने सांगितलंय की, ‘आयसीसी बोर्डाची जुलैमध्ये बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. ‘पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय की, क्रिकेटमध्ये पैसे येत आहेत हे पाहणं चांगलं आहे परंतु आयपीएलसाठी दरवर्षी अव्वल क्रिकेटपटूंना पूर्णपणे बुक करण्याच्या बीसीसीआयच्या योजनेचा आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेवर विपरीत परिणाम होईल.

….तेव्हापासून बंदी

आयपीएलच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानचे खेळाडू सहभागी झाले होते. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सोहेल तन्वीर या मोसमातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही होता. पण 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा आयपीएलमध्ये समावेश  नाही.

मीडिया हक्क विकले

मंगळवारीच बीसीसीआयने आयपीएलचे मीडिया हक्क विकले आहेत. बोर्डाने पाच वर्षांसाठी मीडिया हक्क विकून 48,390 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, आयपीएल अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीग (NFL) नंतर प्रति सामना मीडिया अधिकार मिळवणाऱ्या लीगच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

आता पाकिस्तानच्या या कुरापतखोर वृत्तीवर भारत काय प्रतिक्रिया देणार,  हे पहाणं महत्वाचं ठरेल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.