ENG vs SL 1st Test Live Streaming: इंग्लंड-श्रीलंका पहिला सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?

England vs Sri Lanka 1st Test Live Streaming: क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आता इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याकडे लागलं आहे.

ENG vs SL 1st Test Live Streaming: इंग्लंड-श्रीलंका पहिला सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?
eng vs sl test
| Updated on: Aug 20, 2024 | 10:32 PM

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर विश्रांतीवर आहे. टीम इंडिया आता थेट सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना जवळपास महिनाभर टीम इंडियाच्या सामन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. अशात क्रिकेट चाहत्यांचं सध्या शेजारी श्रीलंका क्रिकेट टीमच्या इंग्लंड दौऱ्यावर लक्ष असणार आहे. श्रीलंका इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. धनंजया डी सिल्वा श्रीलंकेचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर ओली पोप याच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.

इंग्लंड-श्रीलंका पहिला कसोटी सामना केव्हा?

इंग्लंड-श्रीलंका पहिला कसोटी सामन्याला बुधवारी 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

इंग्लंड-श्रीलंका पहिला कसोटी सामना कुठे?

इंग्लंड-श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्याचं आयोजन हे एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे करण्यात आलं आहे.

इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

21 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो आणि मिलन रथनायके,

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), डॅन लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर