ENG vs SL: लॉर्ड्समध्ये गोलंदाजाचा धमाका, Gus Atkinsonचं पहिलवहिलं शतक
Gus Atkinson Century Lords: इंग्लंडचा गोलंदाज गस एटकीन्सन याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक असं पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकीन्सन याने सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक असलेल्या लॉर्ड्समध्ये धमाका केला आहे. एटकीन्सन याने शतक ठोकलं आहे. एटकीन्सने चौकारासह हे शतक पूर्ण केलं. एटकीन्सन याच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. आपल्या कारकीर्दीत एकदातरी लॉर्ड्समध्ये शतक ठोकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. मात्र प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक करणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही लॉर्ड्समध्ये शतक करता आलं नाही. त्यामुळे लॉर्ड्समध्ये शतक करणं ही बाब एका फलंदाजासाठी किती सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आहे, हे स्पष्ट होतं.
दुसऱ्या दिवसाचा खेळ
इंग्लंडने पहिल्या दिवशी 7 विकेट्स गमावून 88 ओव्हरमध्ये 358 धावा केल्या. गस एटकीन्सन आणि मॅथ्यू पॉट्स या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. एटकीन्सनने 74 तर मॅथ्यू पॉट्सने 20 धावांपासून खेळला सुरुवात केली. एटकीन्सनला शतकासाठी 26 धावांची गरज होती. एटकीन्सनने 93 व्या ओव्हरमध्ये शतक पूर्ण केलं. एटकीन्सनने लहिरु कुमारा याच्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चौकार ठोकून 100 धावांचा टप्पा पार केला. एटकीन्सनने 100 बॉलमध्ये 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने हे शतक (103) पूर्ण केलं. विशेष बाब म्हणजे एटकीन्सनने आठव्या स्थानी येत शतक केलं. टीम इंडियासाठी मुंबईकर अजित आगरकर यानेही आठव्याच स्थानी लॉर्ड्समधील शतक केलं होतं.
जो रुटचं 33 वं शतक
दरम्यान एटकीन्सआधी इंग्लंडकडून जो रुट याने या सामन्यात 147 धावांची खेळी केली. जो रुटने 206 बॉलमध्ये 143 रन्स केल्या. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 33 वं तर 49 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. जो रुट याने यासह टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या 48 आंतरराष्ट्रीय शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच रुट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतकं करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला. रुटने एलिस्टर कुक याच्या 33 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.
Gus Atkinson 🔥
Following a ten-wicket haul against West Indies, Gus Atkinson also reaches his maiden Test match century 💯
Name secured on both Lord’s Honours boards.#LoveLords | #ENGvSL pic.twitter.com/XLJ4P7Zlk2
— Lord’s Cricket Ground (@HomeOfCricket) August 30, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकीन्सन , मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके
