ENG vs SL: इंग्लंड-श्रीलंका तिसरा कसोटी सामना कुठे पाहता येणार?

England vs Sri Lanka 3rd Test Live Streaming: इंग्लंड श्रीलंकेविरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना कुठे होणार? जाणून घ्या.

ENG vs SL: इंग्लंड-श्रीलंका तिसरा कसोटी सामना कुठे पाहता येणार?
sri lanka vs england
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 5:58 PM

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. इंग्लंडने दोन्ही सामने चौथ्याच दिवशी जिंकले. इंग्लंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. अशात आता इंग्लंडला तिसरा आणि अंतिम सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेसमोर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड दौऱ्याचा गोड शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे. धनंजया डी सिल्वा हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर ओली पोप याच्याकडे इंग्लंडची सूत्र आहेत. हा तिसरा सामना कुठे होणार? टीव्हीवर कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका तिसरा कसोटी सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका तिसरा कसोटी सामना 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका तिसरा कसोटी सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.

कसोटी मालिकेसाठी श्रीलंका टीम : धनंजया डी सिल्वा(कॅप्टन), निशान मदुष्का, दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल(विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, विश्व राजुन फर्नांडो, कासुन फर्नांडो , कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, रमेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे आणि निसाला थरका.

तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा.
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्.
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?.
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...