AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs WI 2nd Test: कावेम हॉजची शतकी खेळी, दुसऱ्या दिवशी 351 धावा, विंडिजचा चिवट प्रतिकार

England vs West Indies, 2nd Test Stumps: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यातील दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला आहे. विंडिजने 416 धावांच्या प्रत्युत्तरात 351 पर्यंत मजल मारली.

ENG vs WI 2nd Test: कावेम हॉजची शतकी खेळी, दुसऱ्या दिवशी 351 धावा, विंडिजचा चिवट प्रतिकार
kavem hodge centuryImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 20, 2024 | 12:56 AM
Share

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने दुसर्‍या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 84 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 351 धावा केल्या आहेत. विंडिजकडून कावेम हॉज याने शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे विंडिजला 350 पार मजल मारण्यात यश आलं. मात्र त्यानंतरही इंग्लंडकडे 65 धावांची आघाडी आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 416 धावा केल्या होत्या. आता तिसऱ्या दिवशी विंडिज अशीच बॅटिंग करत इंग्लंडवर आघाडी मिळवणार की यजमान संघ पाहुण्यांना रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

विंडिजचं जोरदार कमबॅक

क्रेग ब्रॅथवेट आणि मिकील लुईस या सलामी जोडीने 53 धावांची भागीदारी केली. लुईसने 41 बॉलमध्ये 21 धावा केल्या. क्रेग ब्रॅथवेट 48 आणि कर्क मॅकेन्झी 11 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे विंडिजची स्थिती 3 बाद 84 अशी झाली. त्यामुळे विंडिज अडचणीत सापडली. त्यानंतर अलिक अथनाझे आणि कावेम हॉज या दोघांनी विंडिजचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 175 धावांनी निर्णायक भागीदारी केली. अथनाझे 99 बॉलमध्ये 10 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 82 धावा करुन आऊट झाला. तर दुसऱ्या बाजूला कावेमने आपल्याच चौथ्याच सामन्यात पहिलंवहिलं कसोटी शतक झळकावलं.कावेमने 171 बॉलमध्ये 19 चौकारांसह 120 धावांची खेळी केली. हॉजच्या या खेळीमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपपर्यंत विंडिजला 84 ओव्हरमध्ये 351 धावांपर्यंत पोहचता आलं. विंडिज आता इंग्लंडच्या पहिल्या डावातील 416 धावांपासून फक्त 65 धावांनी मागे आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक 2 विकेट्स या शोएब बशीर याने घेतल्या. तर जेसन होल्डर 23 आणि जोशुआ डा सिल्वा 32 धावा करुन नाबाद परतले.

दुसऱ्याच दिवसाचा खेळ आटोपला

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.

वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

Follow Us
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी