AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs WI : विंडीजला वनडेनंतर टी 20iसीरिजमध्येही क्लीन स्वीप, इंग्लंडचा विजयी ‘षटकार’

England vs West Indies 3rd T20I : इंग्लंड दौऱ्यात विंडीजचा डब्बा गुल झाला आहे. विंडीजला इंग्लंड विरुद्ध वनडे आणि टी 20i मालिकेत विजयाचं खातंही उघडता आलं नाही.

ENG vs WI : विंडीजला वनडेनंतर टी 20iसीरिजमध्येही क्लीन स्वीप, इंग्लंडचा विजयी 'षटकार'
Ben DuckettImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 11, 2025 | 8:21 AM
Share

इंग्लंडचा हॅरी ब्रूक कर्णधार म्हणून जोरदार आणि धमाकेदार सुरुवात करण्यात यशस्वी ठरला आहे. हॅरी ब्रूक याने टीम मॅनेजमेंटचा निर्णय अचूक ठरवत अफलातून कामगिरी करुन दाखवली आहे. जोस बटलर याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील निराशाजनक कामगिरीनंतर वनडे आणि टी 20I संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हॅरी ब्रूक याची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. हॅरीने त्यानंतर कर्णधार म्हणून मायदेशातील पहिल्याच वनडे आणि टी 20I मालिकेत विंडीज विरुद्ध धमाका केला.

हॅरीने इंग्लंडला 3-0 अशा एकतर्फी फरकाने एकदिवसीय मालिका जिंकून दिली. तर त्यानंतर टी 20I मालिकेतही इंग्लंडने विंडीजचा 3-0 ने सुपडा साफ केला. विंडीजला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड करण्याची संधी होती. मात्र विंडीजला लाज राखता आली नाही.

इंग्लंडने 8 जून रोजी सलग दुसरा सामना जिंकत 3 सामन्यांची मालिका जिंकली. इंग्लंडने 2-0अशा फरकाने एकतर्फी आघाडी घेतली. त्यामुळे 10 जून रोजी तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंड जिंकून हॅटट्रिक पूर्ण करणार की विंडीज या दौऱ्यातील पहिला आणि शेवटचा विजय मिळवणार? याची उत्सुकता होती. मात्र इंग्लंडने हायस्कोअरिंग सामन्यात मैदान मारलं. विंडीजने 249 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र विंडीज 37 धावांनी मागे राहिली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 249 धावांचा पाठलाग करताना विंडीजला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 211 पर्यंतच पोहचता आलं.

तिसरा आणि अंतिम टी 20I सामना हायल्कोअरिंग झाला. विंडीजने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी बोलावलं. इंग्लंडने या संधीचा फायदा घेत विंडीजच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत 240 पार मजल मारली. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 248 रन्स केल्या. इंग्लंडच्या पाचही फलंदाजांनी तडाखेदार बॅटिंग केली. जेमी स्मिथ आणि बेन डकेट या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 120 धावा जोडल्या. जेमी स्मिथ याने 26 बॉलमध्ये 230.77 च्या स्ट्राईक रेटने 60 रन्सची तुफानी खेळी केली. जेमीच्या या खेळीत 5 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता.

त्यानंतर डकेट आणि जोस बटलरने दुसऱ्या विकेटसाठी 34 रन्स जोडल्या.जोस बटलरने 2 सिक्स आणि 1 फोरसह 220 च्या स्ट्राईक रेटने 10 बॉलमध्ये 22 रन्स केल्या. बेन डकेट याला शतकाची संधी होती. मात्र विंडीजच्या अकील होसैन याने त्याला रोखलं. डकेट 46 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्ससह 84 रन्स करुन आऊट झाला.

त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जेकब बेथल या जोडीने फटकेबाजी करत इंग्लंडला 240 पार पोहचवलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नॉट आऊट 70 रन्सची पार्टनरशीप केली. हॅरीने 22 बॉलमध्ये 35 तर जेकबने 16 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 248 रन्स केल्या.

प्रत्युत्तरात विंडीजने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र विंडीजला यशस्वी होता आलं नाही. रोव्हमॅन पॉवेल अखेरपर्यंत मैदानात असल्याने विंडीजला विजयाची आशा होती. मात्र डोंगराएवढ्या लक्ष्यासमोर रोव्हमॅनला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.

रोव्हमॅनने सर्वाधिक नाबाद 79 धावा केल्या. कर्णधार शाई होपने 45 रन्स केल्या. शिमरॉन हेटमायर याने 26 तर जेसन होल्डर याने 25 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडसाठी ल्यूक वूड याने 3 विकेट्स घेतल्या. आदिल रशीदने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर ब्रार्यडन कार्स, लियाम डावसन आणि जेकब बेथल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.