AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs ZIM : इंग्लंडने कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा उडवला धुव्वा, दोनदा फलंदाजी करूनही नामुष्की

इंग्लंडने एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा एका डावेने पराभव केला. 22 वर्षांनी हे दोन संघ आमनेसामने आले होते. पण काही खास बदल झाला नाही. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या धावाच झिम्बाब्वेवर भारी पडल्या. या सामन्यात काय झालं ते समजून घ्या

ENG vs ZIM : इंग्लंडने कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा उडवला धुव्वा, दोनदा फलंदाजी करूनही नामुष्की
इंग्लंड कसोटी संघImage Credit source: England Cricket Twitter
| Updated on: May 24, 2025 | 10:31 PM
Share

इंग्लंड आणि झिम्बाब्वे हे दोन संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर 22 वर्षांनी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवण्यासाठी झिम्बाब्वेला विजय महत्त्वाचा होता. पण संघात काहीच बदल झालेला दिसला नाही. इंग्लंडने क्रिकेटमध्ये दुबळ्या असलेल्या झिम्बाब्वेला अक्षरश: चिरडलं. हा सामना काही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नव्हता. त्यामुळे विजयी टक्केवारी ग्राह्य धरली जाणार नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झिम्बाब्वेच्या बाजूने लागला. कर्णधार क्रेग इरविनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात 6 गडी गमवून 565 धावा केल्या आणि डाव घोषित केला. पण या धावांचा पाठलाग दोन्ही डावात करता आला नाही. फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यानंतर 45 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात पाकिस्तानी वंशाच्या इंग्लिश गोलंदाजाने 9 विकेट घेतल्या. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यात या गोलंदाजापासून सावध राहावं लागणार आहे.

इंग्लंडचा डाव

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या तीन खेळाडूंनी झिम्बाब्वेचं कंबरडं मोडलं होतं. झॅक क्राउलेने 124, बेन डकेटने 140, तर ओली पोपने 171 धावांची खेळी केली. तर मधल्या फळीत आलेल्या कर्णधार हॅरी ब्रूकने 58 धावांची खेळी केली. यासह इंग्लंडने पहिल्या डावात 6 गडी गमवून 565 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात ब्रायन बेनेटने 139 धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे डाव 265 धावांवर आटोपला आणि फॉलोअनची नामुष्की ओढावली. त्यानंतर उर्वरित धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ हा 255 धावांवर आटोपला. त्यामुळे 45 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

काय म्हणाला शोएब बशीर?

शोएब बशीरने या सामन्यात 9 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. सामनावीराच्या पुरस्कारनंतर शोएब बशीरने सांगितलं की, ‘हे फिरकी गोलंदाजांसाठी एक चांगले ठिकाण आहे, मला वाटते की चेंडू गेटमधून बाहेर काढणे. पण परत खेळून मुलांसोबत चांगले खेळणे आणि खेळणे पाहून आनंद झाला. मी ग्लॅमॉर्गनला गेलो, काही षटके गोलंदाजी केली, प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला आणि मुलांसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे छान वाटले.’ भारत मालिकेसाठी त्याच्या तयारीवर बशीर म्हणाला की, ‘डकेट आणि क्रॉलीने टेम्पलेट सेट केले आणि त्यांना विरोधी गोलंदाजीवर स्वतःला लादताना पाहणे खूप मजेदार ठरणार आहे. सरावात परतल्यावर, टी20 ब्लास्ट लवकरच सुरू होईल आणि नंतर मैदानावर परत येईल.’

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.