IND vs ENG : पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट निराश, ‘या’ कारणांमुळे पराभव मिळाल्याचं केलं मान्य

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला 151 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. ज्यानंतर कर्णधार जो रुट कमालीचा निराश झालेला दिसत होता.

IND vs ENG : पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट निराश, 'या' कारणांमुळे पराभव मिळाल्याचं केलं मान्य
जो रुट

लंडन : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) लॉर्ड्सच्या मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा (India vs England) दारुण पराभव करत मालिकेतही 1-0 ची आघाडी मिळवली. या मोठ्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वत:वर घेत ‘मी चुकीचं क्षेत्ररक्षण सेट करत गोलंदाजीमध्येही योग्य रणनीती आखू शकलो नाही’ हे मान्य केलं आहे.

भारताने पाचव्या दिवशीची सुरुवात 181 धावांवर सहा बाद अशी केली होती. ज्यावेळी संघाकडे केवळ 154  धावांची आघाडी होती. संघाचा शेवटचा मुख्य फलंदाज ऋषभ पंतही काही वेळातच बाद झाला. ज्यामुळे इंग्लंडने सामन्यात दबदबा निर्माण केला. पण त्याच क्षणी शमी आणि बुमराह जोडीने नवव्या विकेटसाठी 89 धावांची नाबाद भागिदारी करत डाव घोषित केला आणि इंग्लंडला 272 धावांचे आव्हान दिले. ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 120 धावांवर सर्वबाद झाला आणि सामना भारताने 151 धावांनी खिशात घातला.

‘कर्णधार म्हणून ही माझी जबाबदारी’

रूट सामन्यानंतर म्हणाला, “मला वाटतं  शमी आणि बुमराह यांच्याविरुद्धची आमची रणनीती चूकली. एक कर्णधार म्हणून माझ्याकडून रणनीती तयार करण्यात चूक झाली. पण बुमराह आणि शमीने ज्या जागी येऊन धावा केल्या त्यासाठी त्यांचे खरचं अभिनंदन करायला हवे. आम्ही विकेट घेण्याच्या प्रयत्नात धावा वाचवू शकलो नाही ज्यामुळे सामना गमावला.”

‘आम्ही पुनरागमन करुच’

25 ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. त्या सामन्याबद्दल बोलताना रुट म्हणाला, ”हा केवळ दुसराच सामना होता. अजून तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या दोऱ्यात बरंच क्रिकेट खेळणं अजून बाकी आहे. त्यामुळे ही मागे पडायची किंवा निराश होण्याची वेळ नसून पुढे जाण्याची वेळ आहे.  मेरे करियर में कई ऐसे मौके आए हैं जहां दूसरों ने मुझे संभाला है. अभी काफी सारी क्रिकेट खेली जानी बाकी है. तीन मैचों में काफी कुछ हो सकता है. यह घबराने का समय नहीं है.”

इतर बातम्या

IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

(England captain joe root takes responsibility of Lords test defeat against india)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI