IND vs ENG : भारतीय संघाच्या चिंतेत वाढ, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीतून सावरला

इंग्लंड आणि भारता यांच्यातील कसोटी मालिकेत भारत 1-0 ने पुढे असून इंग्लंडचा ,संघ तिसऱ्या कसोटीमध्ये विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे.

IND vs ENG : भारतीय संघाच्या चिंतेत वाढ, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीतून सावरला
ख्रिस वॉक्स
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 7:39 PM

लंडन: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वीच इंग्लंड संघाला दिलासा देणारी एक गोष्ट घडली आहे. संघातील महत्वाचे गोलंदाज स्टुवर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर, मार्क वुड यांच्यासह अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स संघाबाहेर असताना मागील बराच काळ दुखापतग्रस्त असलेला स्टार अष्टपैलू खेळाडू ख्रिस वॉक्स (Chris Woakes) दुखापतीतून सावरला आहे. फिट होत तो मैदानावर परतला असून  23 ऑगस्ट रोजी वारविकशरच्या सेकेंड इलेवनमधून तो सामनाही खेळला. यावेळी त्याने अप्रतिम कामगिरी करत आपल्या पुनरागमनाचा संदेशच क्रिकेट जगताला दिला आहे.

क्रिस पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघातून बाहेर होता. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला ही दुखापत झाली होती. तेव्हापासून तो उपचार आणि सराव घेत ठिक होण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर आता दुखापतीतू सावरत त्याने वारविकशरच्या सेकेंड इलेवनमधून सामना खेळला. यावेळी त्याने 34 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे यावेळी त्याने टाकलेल्या 15 ओव्हरमधील 6 ओव्हर मेडन टाकल्या.

भारताविरुद्ध हीट आहे ख्रिस वॉक्स

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ख्रिस खेळणार की नाही याबाबत अजून कोणती नेमकी माहिती आलेली नाही. मात्र ख्रिसची भारताविरुद्धची कामगिरी उत्कृष्ट आहे. 2018 मध्येही त्याने भारताविरुद्ध उत्तम प्रदर्शन केलं होतं. त्याने दोन कसोटी सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेत इंग्लंडने भारताला 4-1 ने पराभूत केले होते. त्यामुळे आता 1-0 ने कसोटी मालिकेत पिछाडीवर असणारा इंग्लंडचा संघ ख्रिसला खेळवणार का? हे पाहावे लागेल.

हे ही वाचा

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात ‘ही’ आहे भारताची खरी ताकद, इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

(England cricketer Chris woakes returns from injury)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.