
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यात लढत झाली. इंग्लंडने हा सामना 4 गडी राखून जिंकला. या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकात सर्व गडी गमवून 178 धावा केल्या. तसेच विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना इंग्लंडची चांगलीच दमछाक झाली. इंग्लंडला हे आव्हान गाठण्यासाठी 46.1 षटकांचा सामना करावा लागला. त्यातही सहा विकेट गमावल्याने धाकधूक वाढली होती. पण हीथर नाईटने यशस्वी झुंज दिली. तिने 111 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकार मारत 79 धावांची नाबाद खेळी केली. तिला चार्लोट डीनने साथ दिली. तिने 56 चेंडूत 2 चौकार मारत नाबाद 27 धावा केल्या. बांगलादेशकडून फहिमा खातुनने 3, मारुफा अक्तरने 2, शान्झिदा अक्तरने 1 विकेट घेतला. या सामन्यात हीथर नाईटला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हीथर नाईट म्हणाली की, ‘परिस्थिती सोपी नव्हती. गोलंदाजी प्रभावी आणि कौशल्यपूर्ण होती. आम्ही स्वतःसाठी थोडीशी तयारी केली. शेवटी भागीदारी झाली. सुरुवात करणे सोपे नव्हते. मार्चच्या मध्यापासून खेळात योग्य सुधारणा केली आहे. सुरुवातीला टप्प्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. थोडा अवघड होता. अक्तरने खूप चांगली गोलंदाजी केली. ती चेंडू उशिराने स्विंग करते. फ्रंट पॅडला धोका देतो. सुदैवाने काही रिप्रीव्हज मिळाले. मला वाटले की ते बरोबर आहे. टीव्ही अंपायरने निर्णय घेतला. चार्ली चांगली खेळली. ती छोटीशी भागीदारी झाली. आम्हाला माहित होते की जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी फक्त एक भागीदारी आवश्यक आहे. ती तिच्या फलंदाजीवर खूप मेहनत घेते.’
बांगलादेशची कर्णधार निगार सुल्ताना म्हणाली की, ‘हा एक अविश्वसनीय खेळ होता. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही कसा संघर्ष केला ते अविश्वसनीय होते. आम्ही काही विकेट गमावल्या आणि भागीदारी झाली, पण आम्हाला शेवटपर्यंत फलंदाजीसाठी एका सेट फलंदाजाची आवश्यकता होती. आम्ही 20-30 धावांनी कमी पडलो होतो.’ खरं तर हा सामना बांगलादेशच्या बाजूने झुकलेला होता. नेमकं काय चुकलं ते सुल्तानाने शेवटी सांगितलं.’सहा विकेट घेतल्यानंतर आम्ही खूप चुका केल्या. हवी तशी गोलंदाजी केली नाही. फहिमाने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. परंतु इतरांनी तिला पाठिंबा देण्याची गरज होती.’