ऑस्ट्रेलिया की पाकिस्तान! कोणाच्या विजयामुळे भारताला नुकसान? जाणून घ्या
वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणआर आहे. हा सामना पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा सामना पाकिस्तानने गमावला तर पुढचं गणित जर तर वर येणार आहे.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील तिसऱ्या टप्प्यातील सामने नवव्या सामन्यापासून होत आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येत आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. पण हा सामना पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा सामना पाकिस्तानने गमावला तर पुढचं सर्वच गणित बिघडणार आहे. जर तसं झालं तर प्रत्येक सामन्यात करो या मरोची लढाई असणार आहे. प्रत्येक संघाला रॉबिन राउंड पद्धतीने सात सामने खेळायचे आहेत. त्यात पाकिस्तानने सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात बांग्लादेश आणि दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे गुण तर गेलेच पण नेट रनरेटमध्येही फटका बसला आहे. त्यामुळे आता तिसरा सामना जिंकून स्पर्धेत राहावं लागणार आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर पुढचं गणित कठीण होणार आहे.
पाकिस्तानने दोन सामने गमावत 0 गुणांसह नेट रनरेट हा -1.777 इतका आहे. तर ऑस्ट्रेलियाने एका सामना जिंकला, तर एक सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आहे. त्यामुळे 3 गुण आणि +1.780 नेट रनरेट आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर गुणतालिकेत थेट पहिलं स्थान गाठणार आहे. त्यामुळे भारताला फटका बसणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर भारताचं स्थान घसरणार आहे. त्यामुळे भारताला पुन्हा पहिलं स्थान गाठायचं तर दक्षिण अफ्रिकेचा सामना जिंकावा लागेल. तसेच नेट रनरेटही चांगाल ठेवावा लागणार आहे. खरं तर अजूनही उपांत्य फेरीची शर्यत रंगतदार वळणावर आलेली नाही. पण पहिल्या चार संघात राहणं गरजेचं आहे. कारण टॉपच्या चार संघांना उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. तर उर्वरित चार संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम: एलिसा हीली (कर्णधार), डार्सी ब्राउन, एश्ले गार्डनर, किम गार्थ, हीथर ग्राहम, एलेना किंग, फोएबे लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिन्यु, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगान शुट्ट, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वोल आणि जॉर्जिया वेयरहैम.
पाकिस्तान महिला क्रिकेट टीम: फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाज, डायना बेग, एयमान फातिमा, मुनीबा अली, नशरा संधू, नतालिया परवेज, ओमैमा सोहेल, रमीन शमीम, सदफ शमस, सादिया इकबाल, शवाल जुल्फिकार, सिदरा अमीन, सिदरा नवाज आणि सैयदा अरूब शाह.
