AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर

नुकतंच श्रीलंका संघाला नमवत इंग्लंडने ग्रुप 1 मध्ये सलग चौथा विजय मिळवला. या विजयासह त्यांची सेमीफायनलमधील जागा निश्चित झाली आहे. पण याचदरम्यान त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर
टायमल मिल्स दुखापतग्रस्त
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 9:47 PM
Share

T20 Cricket World Cup 2021: इंग्लंड क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सोमवारी श्रीलंका संघाला मात देत स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला.  इंग्लंडने श्रीलंका संघाला 26 धावांनी मात देत हा विजय मिळवला. त्यामुळे ग्रुप 1 मध्ये सर्वाधिक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये एन्ट्रीही त्यांनी मिळवली. पण याच सामन्यात त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) याबद्दलची माहिती दिली.

मिल्सला श्रीलंकेविरुद्ध सामना खेळत असताना सामन्यादरम्यानचं दुखापत झाली. तो दुसरी ओव्हर टाकत असताना तिसऱ्या चेंडूवेळी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो सामन्यात 1.3 ओव्हरचं बोलिंग करु शकला. त्यानंतर त्याच्या दुखापतीचे स्कॅन ककरण्यात आले. मंगळवारी रात्री ही दुखापत गंभीर असल्याचं समजलं, ज्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेतून विश्रांतीसाठी बाहेर पडावं लागणार आहे. त्याने या स्पर्धेत 4 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत.

श्रीलंकेला नमवत इंग्लंज सेमीफायनलमध्ये

श्रीलंका आणि इंग्लंड या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेने सर्व संघ करत असल्यालप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडला कमी धावात बाद करुन नंतर टार्गेट पूर्ण करु असा विचार श्रीलंका संघाने केला. पण या स्वप्नाच्या मध्ये जोस बटलर आला. त्याने 67 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार ठोकत नाबाद 101 धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने 40 धावांची साथ दिल्यामुळे इंग्लंडने स्कोरबोर्डवर 163 धावा लावल्या.

164 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. असलंकाने 21, कर्णधार शनाका आणि भानुपक्षा यांनी प्रत्येकी 26 धावा केल्या. तर सर्वाधिक वानिंदू हसरंगाने 34 धावा कुटल्या. पण तोही बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज लक्ष्यापर्यंत पोहचू शकले नाहीत, 137 धावांवर संघ सर्वबाद झाल्यामुळे श्रीलंका 26 धावांनी पराभूत झाली. ज्यामुळे इंग्लंड विजयासह पुढील फेरीत पोहचली आहे.

हे ही वाचा :

T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

T20 World Cup 2021: केवळ 38 चेंडूत ऑस्ट्रेलियाने संपवला सामना, बांग्लादेशला मात देत सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल

(England fast bowler tymal mills ruled out of world cup due to injury)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.