AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : भारतात खेळल्यानंतर बंदी घालताच अनुभवी खेळाडूकडून निवृत्तीचा निर्णय, कोण आहे तो?

कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलेल्या माजी ऑलराउंडरने देशांतर्गत क्रिकेटला रामराम ठोकला आहे. जाणून घ्या कोण आहे तो.

Cricket : भारतात खेळल्यानंतर बंदी घालताच अनुभवी खेळाडूकडून निवृत्तीचा निर्णय, कोण आहे तो?
Samit Patel ENG vs INDImage Credit source: Getty
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 24, 2026 | 6:38 PM
Share

क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्ष योगदान दिलेल्या माजी बॉलिंग ऑलराउंडरने देशांतर्गत क्रिकेटला अलविदा केला आहे. इंग्लंडच्या समित पटेल याने वयाच्या 41 व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समितवर टी 20 ब्लास्ट स्पर्धेत 6 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. त्यानंतर समितने देशांतर्गत क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. समितवर बंदी का घातली गेली हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. इंग्लंड-वेल्स क्रिकेट बोर्डाने समित पटेल याच्यावर बंदी घातली. काही महिन्यांपूर्वी गोव्यात वर्ल्ड लेजेंड्स प्रो लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. समित या स्पर्धेत सहभागी झाला होता.

बंदीमागील कारण काय?

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड लेजेंड्स प्रो लीग या स्पर्धेला बीसीसीआयकडून परवानगी देण्यात आली नव्हती. ईसीबीच्या नियमानुसार, परवानगी नसलेल्या स्पर्धेत सहभागी झाल्यास इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंना 6 महिने सहभागी होता येत नाही. त्यानुसारच समितवर ही कारवाई करण्यात आली. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज पीटर सिडल यालाही याच कारणामुळे बंदीच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे.

समित पटेल आणि निवृत्ती

“मी माझ्या देशांतर्गत क्रिकेट कारकीर्दीचा शेवट करत आहे. मात्र मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून दूर जाणार नाही. मी आता कोचिंग, मेंटॉरिंग आणि कॉमेंट्रीत योगदान देण्यासाठी उत्सूक आहे”, असं समितने स्पष्ट केलं.

“मला या खेळाने खूप काही दिलं आहे. मी आयुष्यभराचे सोबती बनवले आहेत. मी जगभर फिरलोय. ट्रॉफी जिंकण्याच्या आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत कायम राहतील”, असंही समितने नमूद केलं.

समित पटेल याची क्रिकेट कारकीर्द

समितने नॉटिंघमशरचं तब्बल 22 वर्ष अनेक प्रकारात प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच समित काही वेळ डर्बीशरकडून खेळला आहे. समितने देशांतर्गत क्रिकेटमधील 231 फर्स्ट क्लास, 253 लिस्ट ए आणि 429 टी 20 सामने खेळले आहेत. समितने या दरम्यान 25 हजार 973 धावा केल्या आहेत. तसेच समितने 957 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच समितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचं 18 टी 20i, 36 एकदिवसीय आणि 6 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल