IND vs ENG : भारताची इंग्लंड दौऱ्यात ‘कसोटी’, खेळाडूंसमोर पावलोपावली आव्हान
India Tour Of England 2025 Explainer : टीम इंडिया 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात एकूण 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियासाठी ही मालिका मोठी 'कसोटी' असणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच मालिका असणार आहे. टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणं बाकी आहे. मात्र या मालिकेनिमित्ताने टीम इंडियाची या दौऱ्यात खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ असणार आहे. टीम इंडियाला या मालिकेत कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार? हे सविस्तर जाणून घेऊयात. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या...
