ENG vs IND 2nd Test : 2 जुलैपासून दुसरा सामना, टेस्ट मॅच किती वाजता सुरु होणार?
England vs India 2nd Test Live Streaming : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपला दुसरा कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध 2 जुलैपासून खेळणार आहे. या सामन्याबाबत सर्व तपशील जाणून घ्या.

पहिल्या कसोटी सामन्यात धमाकेदार बॅटिंग करुनही भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. भारताच्या 4 फलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध लीड्समध्ये 5 शतकं केली. ऋषभ पंतने दोन्ही डावात शतक झळकावलं. मात्र सुमार बॉलिंग आणि निराशाजनक फिल्डिंगमुळे भारताने सामना गमावला. इंग्लंड यासह 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरली. भारताच्या खेळाडूंनी या सामन्यात 8 कॅचेस सोडल्या. त्यामुळे इंग्लंडला सामना जिंकण्यात मदत झाली. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका करण्यात आली. या पराभवानंतर आता भारतीय संघ कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना केव्हा?
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना कुठे?
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एप वर लाईव्ह पाहायला मिळेल.
टीम इंडियाच दुसऱ्या सामन्याआधी जोरदार सराव
दरम्यान भारताच्या संघाच्या मनात पहिल्या पराभवाची सल आहे. तसेच भारतीय संघाकडून पहिल्या सामन्यात अनेक चुका झाल्या. त्यामुळे भारताला दमदार कामगिरी करुनही पहिला सामना गमवावा लागला. त्यामुळे आता याच चुका दुसऱ्या सामन्यातही होऊ नये, त्यासाठी भारतीय संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आणि हेड कोच गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात जोरदार सराव केला आहे. बीसीसीआयने या सरावाचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे या सरावाचा भारताला विजय मिळवण्यात किती फायदा होतो? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
