ENGW vs INDW 1st T20i : गुरुवारपासून इंडिया-इंग्लंड टी 20i मालिकेचा थरार, पहिला सामना किती वाजता?

India Women tour of England 2026 : येत्या 12 जूनपासून टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी ही टी 20i मालिका फार महत्त्वाची आहे.

ENGW vs INDW 1st T20i : गुरुवारपासून इंडिया-इंग्लंड टी 20i मालिकेचा थरार, पहिला सामना किती वाजता?
Shreyanka Patil and Harmanpreet Kaur
Image Credit source: Icc
| Updated on: May 28, 2026 | 2:17 AM

वुमन्स टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India Women tour of England 2026) आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका आणि टेस्ट मॅच खेळणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात गुरुवार 28 मे पासून होणार आहे. हरमनप्रीत कौर या टी 20i मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना ही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच शार्लट डीन इंग्लंडची कॅप्टन्सी करणार आहे. या मालिकेतील पहिल्या टी 20i सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना गुरुवारी 28 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना चेल्म्सफोर्ड येथील काउंटी ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स पहिल्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स पहिल्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मॅच लाईव्ह पाहता येईल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड वुमन्स यांच्यात आतापर्यंत 35 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने या 35 पैकी सर्वाधिक सामन्यांत टीम इंडियावर मात केली आहे. इंग्लंडच्या महिला ब्रिगेडने 24 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियानला फक्त 11 सामन्यांत यश आलं आहे.

गेल्या टी 20i मालिकेत काय झालं होतं?

दरम्यान टीम इंडिया गेल्या वर्षीही इंग्लंड दौऱ्यावर आली होती. तेव्हा उभयसंघात 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. तेव्हा टीम इंडियाने यजमान इंग्लंड विरुद्ध टी 20i मालिका जिंकली होती. टीम इंडियाने इंग्लंडला 3-2 ने पराभूत करुन मालिकेवर नाव कोरलं होतं. त्यामुळे टीम इंडिया यंदाही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार की इंग्लंड या पराभवाची परतफेड करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहण्यासाठी सामन्यासह निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Follow Us