ENGW vs PAKW Live Streaming : इंग्लंड सलग चौथ्या विजयासाठी सज्ज, पाकिस्तान रोखणार का?
England vs Pakistan Womens World Cup 2025 Live Match Score : इंग्लंडला बुधवारी पाकिस्तानला पराभूत करत विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसमोर सलग चौथा पराभव टाळण्याचं आव्हान असणार आहे.

आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 16 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान आमनसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा चौथा सामना असणार आहे. तसेच चौथ्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर फातिमा सना पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. इंग्लंडला हा सामना जिंकून विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर पाकिस्तानसमोर विजयी खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहायला मिळेल? हे आपण जाणून घेऊयात.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना कधी?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना बुधवारी 15 ऑक्टोबरला होणार आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना कुठे?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
इंग्लंडने 11 ऑक्टोबरला श्रीलंकेला पराभूत करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. इंग्लंडने त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत केलं. त्यामुळे इंग्लंकडे आता पाकिस्तानचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीसाठी दावा आणखी मजबूत करण्याची संधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, इंग्लंड पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. इंग्लंडचा नेट रनरेट हा +1.864 असा आहे.
तर दुसर्या बाजूला पाकिस्तान अजूनही पहिल्याच विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पाकिस्तानला आपल्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये सपाटून मार खावा लागला आहे. बांगलादेश, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी पाकिस्तानला लोळवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयी खातं उघडण्यासाठी इंग्लंडचा विजयरथ रोखावा लागणार आहे. आता यात पाकिस्तान किती यशस्वी ठरणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
