T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध ‘हा’ संघ घेऊन खेळल्यास विजय सोपा, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले अंतिम 11

| Updated on: Oct 22, 2021 | 5:23 PM

भारतीय संघाने दोन्ही सराव सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या 11 खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघात स्थान द्यायचं हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर पडला आहे.

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध हा संघ घेऊन खेळल्यास विजय सोपा, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले अंतिम 11
व्हीव्हीएस लक्ष्मण
Follow us on

T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. दोघांचाही यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) हा पहिला सामना असणार आहे. या सामन्याकडे भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेट रसिक डोळे लावून आहेत. अत्यंत चुरशीचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही संघाच्या भव्य सामन्याआधी क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज विविध विधानं करत आहेत. आता भारताचा माजी क्रिकेटपचू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही एक विधान करत त्याला उत्तम कामगिरी करतील असं वाटत असलेले अंतिम 11 भारतीय क्रिकेटपटू निवडले आहेत.

लक्ष्मणच्या मते सलामीला केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी यावं. त्यानंतर वन डाऊन विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतला यांनी एक एक करुन फलंदाजीला यावं. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि सातव्या क्रमांकावर रवींद्र जाडेजा यांनी फलंदाजी करावी. फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्ये दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज असावे. ज्यामध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह तर फिरकीपटू म्हणून वरूण चक्रवर्ती आणि राहुल चाहर यांनी खेळावं. अशी अंतिम 11 लक्ष्मणच्या मते आहे.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य पाकिस्तानी संघ – बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ.

हे ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup च्या 2 सराव सामन्यात केवळ 1 धाव, डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म आयपीएलमधील वर्तवणुकीमुळे गेला?

(Ex Indian Cricketer VVS Laxman choose his playing 11 for indi vs pakistan match ICC t20 world Cup)