AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup च्या 2 सराव सामन्यात केवळ 1 धाव, डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म आयपीएलमधील वर्तवणुकीमुळे गेला?

एकेकाळी सनरायझर्स हैद्राबाद संघाला ट्रॉफी जिंकवून देणारा संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला यंदाच्या पर्वात मात्र संघातूनच बाहेर ठेवण्यात आले होते.

T20 World Cup च्या 2 सराव सामन्यात केवळ 1 धाव, डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म आयपीएलमधील वर्तवणुकीमुळे गेला?
डेव्हिड वॉर्नर
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 10:58 PM
Share

T20 World Cup 2021: जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक सलामीवीरांमधील एक नाव म्हणजे डेव्हिड वॉर्नर (David Warner). पण अलीकडे काही काळापासून त्याची बॅट अगदी शांत आहे. साधा दुहेरी आकडा गाठण्यासाठीही वॉर्नरला संघर्ष करावा लागतो आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दोन्ही सराव सामन्यातही तो फेल ठरला. न्यूझीलंडविरुद्ध शून्य धावांवर तर भारताविरुद्ध 1 धाव करुन तो तंबूत परतला. दरम्यान यावर बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने वॉर्नरचा फॉर्म जाण्यामागे त्याला आयपीएलमध्ये दिलेली वागणूक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. लीच्या मते वॉर्नरला आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघ व्यवस्थापनाकडून अत्यंत चूकीची वागणूक देण्यात आली.

आयसीसीमध्ये आपल्या कॉलममध्ये लिहिताना ब्रेट लीने वॉर्नरच्या खराब फॉर्म मागील कारण सांगितलं आहे. त्याने लिहिलं आहे की, ‘ऑस्ट्रेलियाच्या सर्वात टॅलेंटेड खेळाडूंमधील एक म्हणजे डेव्हिड वॉर्नर. सध्या तो फ्लॉप असला तरी महत्त्वाच्या सामन्यात तो नक्कीच धावा करेल. पण त्याला आय़पीएलमध्ये जी वागणूक मिळाली त्यामुळे त्याचा आत्मविश्वास तुटला असून फॉर्मही गेला आहे.’

काय घडलं वॉर्नर आणि हैद्राबाद संघात?

सनरायझर्स हैद्राबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैद्राबाद संघातील (Sunrisers Hyderabad) नातं आता पहिल्यासारखं राहिलेलं दिसत नाही. एकेकाळी संघातून आयपीएल गाजवलेला वॉर्नर आता संघाच्या बसमध्येही दिसत नसल्याचं समोर येत होतं. काही सामन्यात खराब खेळीमुळे आधी वॉर्नरचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्यानंतर युएईमध्ये झालेल्या सामन्यांत तर वॉर्नर सनरायझर्सकडून एकही सामना खेळला नाही. तसंच संघ व्यवस्थापनाकडूनही डेव्हिड वॉर्नरला वाईट वागणूक मिळत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्याला संघाच्या संघासोबत बसमध्ये प्रवासासाठी वगळलं जात होतं, तो डगआऊटमध्येही दिसत नव्हता, तो टीमच्या हॉटेलमध्येच थांबत असल्याचं समोर आलं होतं.

हे ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

(David Warner bad form due to harsh treatment by SRH in IPL says brett lee)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.