CPL : 10 चेंडूत 50 धावा, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा जलवा, पोलार्डचा संघ विजयी

| Updated on: Sep 06, 2021 | 10:59 AM

कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये शाहरुख खानच्या मालकीचा संघ त्रिनिबागो नाइट रायडर्स उत्तम कामगिरी करत असून कर्णधार पोलार्डच्या नेतृत्त्वाखाली एका मागोमाग एक विजय मिळवत आहे.

CPL : 10 चेंडूत 50 धावा, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा जलवा, पोलार्डचा संघ विजयी
लेंडल सिमॉन्स
Follow us on

मुंबई : जगभरातील क्रिकेट रसिक सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगचा (CPL) थरार अनुभवत आहेत. भारताच्या आयपीएल संघातील धाकड खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. तुफान फटकेबाजी, भेदक गोलंदाजीसह अप्रतिम क्षेत्ररक्षणाची पर्वणी रोज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. रविवारी झालेल्या त्रिनिबागो नाइट रायडर्स (Trinibago Knight Riders) विरुद्ध जमाइका थल्लावाज (Jamaica Tallawahs) सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा माजी खेळाडू असणाऱ्या लेंडल सिमॉन्सने (Lendl Simmons) त्रिनिबागो नाइट रायडर्सकडून अवघ्या 10 चेंडूमध्ये 50 धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला. कायरन पोलार्ड कर्णधार असणारी नाईट रायडर्स हा सामना दिमाखात जिंकली.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जमाइका थल्लावाज संघाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेटच्या बदल्यात 144 धावा केल्या. दरम्यान जमाइका संघाचे पहिले 5 फलंदाज केवळ 11 धावा करु शकले होते.  दोन खेळाडू तर शून्यावर बाद झाले. पण मधल्या फळीतील कार्लोस ब्रेथवेटने एकाकी झुंज देत 40 चेंडूत 58 धावा ठोकल्या. ज्यामुळे ते प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं आव्हान देऊ शकले. नाइट रायडर्सकडून रवि रामपाल आणि अकिल होसैन यांनी 2-2 बळी घेतले.

सिमॉन्सचे 5 षटकार, पोलार्डचा संघ विजयी

ट्रिनबागो नाइट रायडर्स संघ फलंदाजीला आल्यानंतर त्यांच्या समोर 145 धावांचे लक्ष्य होते. त्यांनी आपल्या आक्रामक खेळीच्या जोरावर 17.1 ओव्हरमध्येच हे लक्ष्य मिळवत सामना जिंकला. नाइट रायडर्सचा सलामी फलंदाज लेंडल सिमॉन्सने 75 मिनिटं फलंदाजी केली. त्याने 45 चेंडूचा सामना करत 5 षटकरांच्या मदतीने 70 धावा केल्या. तब्बल 155.55 च्या सरासरीने सिमॉन्सने 50 धावा तर केवळ 10 चेंडूतच केल्या आहेत.

हे ही वाचा

भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा

CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO

(EX mumbai indians teammate lendl simmons Scores half century in Cpl and pollards team Won)