क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच 2025 या वर्षात दहा घडामोडी घडल्या, काय ते जाणून घ्या

क्रिकेट विश्वात रोज नवे विक्रम रचले आणि मोडले जातात. पण क्रिकेटसाठी 2025 हे वर्ष खास राहिलं. या वर्षात 10 घडामोडी अशा घडल्या त्याचा कधी क्रीडारसिकांनी विचारही केला नव्हता. काय ते जाणून घ्या.

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच 2025 या वर्षात दहा घडामोडी घडल्या, काय ते जाणून घ्या
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच 2025 या वर्षात दहा घडामोडी घडल्या, काय ते जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 31, 2025 | 8:42 PM

क्रिकेट जगतासाठी 2025 हे वर्ष खास राहिलं. या वर्षात क्रिकेटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. आता नव्या वर्षात क्रिकेटचे बरेच कार्यक्रम आहेत. या वर्षात टी20 वर्ल्डकप, अंडर 19 वर्ल्डकप, आयपीएल, वुमन्स प्रीमियर लीग आणि टी20-वनडे-कसोटी मालिका होणार आहेत. त्यामुळे नवं वर्ष क्रीडारसिकांसाठी मेजवानी असणार आहे. पण 2025 या वर्षात बऱ्याच घडामोडी पहिल्यांदाच घडल्या. चला जाणून घेऊयात 2025 वर्षातील 10 मोठ्या घडमोडी…

  • भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने 2025 या वर्षात कमाल केली. भारताने पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप जिंकला. 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये जेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं.
  • भारतीय पुरूष संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. चॅम्पियन्स ट्रॉफी तीन वेळा जिंकण्याचा मान टीम इंडियाला मिळाला आहे. यापूर्वी कोणत्याही संघाने तीन वेळा जेतेपद मिळवलेलं नाही. भारताने 2002, 2013 आणि 2025 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात दक्षिण अफ्रिकेने जेतेपद मिळवलं. दक्षिण अफ्रिकने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं. लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानात ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. 282 धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमने 136 धावांची खेळी केली.
  • आरसीबीने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं. 18व्या पर्वात त्यांना हे यश मिळालं. अंतिम फेरीत पंजाब किंग्स 6 धावांनी पराभूत करून जेतेपद मिळवलं. त्यामुळे आयपीएल जेतेपदाची प्रतीक्षा मागच्या वर्षी संपली.
  • मिचेल स्टार्कने 2025 वर्षात भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त 15 चेंडूत 5 विकेट काढल्या. हा क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम आहे. वेस्ट इंडिजच्या 7 फलंदाजांना शून्यावर बाद केले. हा देखील मोठा विक्रम आहे.़
  • जो रूटसाठी 2025 वर्ष खूप चांगलं गेलं. त्याने या वर्षात जबरदस्त कामगिरी केली. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत 6 हजार धावा पूर्ण केल्या. हा देखील एक विक्रम आहे.
  • ग्लासगोमध्ये नेपाळ आणि नेदरलँड यांच्यात सामना पार पडला. हा सामना उत्कंठा वाढवणारा होता. कारण या सामन्याच्या निकालासाठी तीन सुपर ओव्हर खेळल्या गेल्या. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. नेदरलँडने या सामन्यात विजय मिळवला.
  • क्रिकेट इतिहासात एकाच षटकात पाच विकेट घेण्याचा दुर्मिळ विक्रमही या वर्षात झाला. इंडोनेशियाच्या गेडे प्रियंदनाने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात 5 विकेट घेतल्या. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला.
  • भुटानच्या सोनम येशे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने एका सामन्यात 8 विकेट घेण्याचा मान मिळवला. अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. म्यानमार विरूद्धच्या सामन्यात 7 धावा देत 8 विकेट घेतल्या.