AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: आगामी आयपीएल 2022 च्या लिलावासंबधी मोठी माहिती समोर, नव्या दोन संघाच्या समावेशानंतर लिलावप्रक्रियेत महत्त्वाचे बदल

IPL Retention Rules: आगामी आयपीएलमध्ये अर्थात IPL 2022 मध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणाही करण्यात आली असून लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाली आहे.

IPL 2022: आगामी आयपीएल 2022 च्या लिलावासंबधी मोठी माहिती समोर, नव्या दोन संघाच्या समावेशानंतर लिलावप्रक्रियेत महत्त्वाचे बदल
आयपीएल लिलाव
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 6:03 PM
Share

दुबई : कोरोनाचा शिरकाव त्यामुळे एकीकडे स्थगिती, मग स्पर्धेचं ठिकाण बदलत अखेरकार आयपीएल 2021 (IPL2021) पार पडली. त्यानंतर आता टी20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली आहे. पण सोबतच आगामी आयपीएल अर्थात IPL 2022 संबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. यावेळी आयपीएलमध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणाही काही दिवसांपूर्वीच  करण्यात आली. लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाल्यानंतर आता खेळाडूंची लिलावप्रक्रिया पार पडण्यापूर्वी आणखी काही महत्त्वाचे नियम समोर आले आहेत.

नव्याने समोर आलेल्या नियमांनुसार आधीपासून आयपीएलमध्ये खेळत असलेले 8 संघ हे त्यांचे 4 जुने खेळाडू रिटेन करु शकतात. अर्थात संघात कायम ठेवू शकतात. असे करुन उरलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी 3 खेळाडू हे नव्याने सामिल झालेले लखनौ आणि अहमदाबाद हे संघ आपल्या ताफ्यात घेऊ शकणार आहेत. आगामी लिलावाची तारीख जाहीर झाली नसली तरी यंदा संघाना 90 कोटी रुपये घेऊन खेळाडू विकत घेता येणार आहेत. मागील वर्षी ही किंमत 85 कोटी इतकी होती.

परदेशी खेळाडूंचं काय?

या नव्याने जाहीर केलेल्या नियमांनुसार आयपीएलमध्ये सध्या खेळत असलेले 8 संघ हे संघात ठेवणाऱ्या खेळाडूंमध्ये 4 खेळाडूंपैकी 3 भारतीय 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी असंही संयोजन वापरु शकतात. तर नव्या संघासाठी 3 पैकी 2 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडू घेण्याचा नियम करण्यात आला आहे.

12 हजार कोटींच्या घरात नव्या दोन्ही संघाची किंमत

दुबईमध्ये झालेल्या नव्या संघाच्या लिलाव प्रक्रियेत तब्बल 12 हजार कोटींच्या घरात दोन्ही संघ विकत घेण्यात आले आहेत. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेडसारख्या बड्या कंपन्या आणि संघासह रणवीर सिंगसारखा अभिनेताही लिलाव प्रक्रियेत होता. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.तर सीवीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाला जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी मोजावी लागलेली किंमत तब्बल 12 हजार कोटींहूनही अधिक आहे.

इतर बातम्या

पाकिस्तानच्या क्रिकेट संघात 3 खेळाडू कोरोनाबाधित, क्रिकेट बोर्डाने दिली माहिती

T20 World Cup 2021 मध्ये ‘या’ गोलंदाजांचा जलवा, भारताचे शेजारी करत आहेत धमाल!

India vs pakistan: ‘सामन्यानंतर विराटने पाकिस्तानच्या खेळाडूंना मिठी मारली, म्हणून त्यालाही अटक करणार का?,’ ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा सवाल

(For IPL 2022 new IPL Retention Rules comes in which old teams can keep four players ahead of 2022 auction and three early picks for new teams Ahmedabad and Lucknow IPL franchise)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...