AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : कुरवीला आणि मोहंती टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

भारताचे वरीष्ठ क्रिकेटपटू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाले. या पराभवानंतर आता युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान यावेळी दोऱ्यावर संघासोबत देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला हे दोन माजी भारतीय क्रिकेटपटू देखील जाणार आहेत.

IND vs SL : कुरवीला आणि मोहंती टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर, नेमकं कारण काय?
Team India
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 6:49 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) न्यूझीलंड संघाकडून पराभूत झाला आणि जगज्जेता होण्यापासून थोडक्यात राहिला. पण म्हणतातना ‘शो मस्ट गो ऑन’ तसं म्हणत आता भारताचे युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यासाठी संपूर्णपणे तयार झाली आहे. कोणते खेळाडू, कोण मुख्य प्रशिक्षक ही सारी नावं समोर आली असून विशेष म्हणजे यंदा दोन निवडकर्ते देखील संघासोबत या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला अशी या दोघांची नावे असून ते देखील संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत.

संघाचे नेतृत्त्व शिखर धवन करणार असून भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. सोबत जाणाऱ्या 18 सदस्यीय सपोर्ट स्टाफची नावंही बीसीसीआयने जाहिर केली आहेत. भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज क्रिकेटपचू राहुल द्रविडला संधी देण्यात आली आहे. तर सुधीर असनानी हे मॅनेजर असणार आहेत. 

18 सदस्यीय सपोर्ट स्टाफ

राहुल द्रविड (मुख्य प्रशिक्षक), सुधीर असनानी (मॅनेजर), पारस म्हांब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक), टी दिलीप (फील्डिंग प्रशिक्षक), आशीष कौशिक (फिजियो), निरंजन पंडित (फिजियो), आनंद दाते (ट्रेनर), अल हर्षा (ट्रेनर), अशोक साध (थ्रोडाउन विशेषज्ञ), सौरव अंबाडकर (थ्रोडाउन विशेषज्ञ), सुमित मलापुर्कर (लॉजिस्टिक मॅनेजर), आनंद सुब्रामण्यम (मीडिया मॅनेजर), अमेया तिलक (कंटेंट प्रोड्यूसर), अभिजीत साल्वी (टीम डॉक्टर), रविंद्र ढोलपुरे (सिक्यॉरिटी ऑफिसर), नंदन माझी (मसाज), मंगेश गायकवाड़ (मसाज), एल वरुण (अॅनलिस्ट)

धवनला पहिल्यांदा संघाचं नेतृत्व करण्याची संधी

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारख्या नियमित सदस्यांशिवाय भारतीय संघ श्रीलंका दोऱ्यावर जात आहे. शिखर धवन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहेत. याच वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली टी -20 करंडक स्पर्धेत दिल्लीचे नेतृत्व केले होतं. तो भारतीय संघात सर्वात वरिष्ठ सदस्य आहे. त्याच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, मनीष पांडे आणि युजवेंद्र चहल हे संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये आहेत.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

हे ही वाचा :

WTC Final मध्ये पराभवानंतर श्रीलंका दौरा जिंकण्यासाठी युवा क्रिकेटपटू करतायत मेहनत, बीसीसीआयने शेअर केले फोटो

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!

(For Sri Lanka tour Two Selectors Debashish Mohanty And Abey kuruvilla will go With Indian Cricket Team)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.