क्रिकेटपटूचं दैव बलवत्तर म्हणून मृत्यूवर दोनदा मात, झालं असं की…
झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटू गाय व्हिटल हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 5 सप्टेंबर हा त्याचा जन्मदिवस असतो. त्याची क्रिकेट कारकिर्द जबरदस्त राहिली आहे. पण त्याने दोन वेळा मृत्यूला हुलकावणी दिली आहे. पण कसं काय झालं ते समजून घ्या.

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हिटल हा 5 सप्टेंबर 2025 रोजी 53 वर्षांचा राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा संघ तशी कामगिरी करू शकला नाही. पण या खेळाडून संघासाठी अष्टपैलू भूमिका बजावली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघासाठी 10 वर्षे घालवली आहेत. गाय व्हिटल 1993 ते 2003 या कालावधीत झिम्बाब्वेसाठी खेळला. यात त्याने 46 कसोटी आणि 147 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत 2207 धावा आणि वनडेत 2705 धावा केल्या ठआहेत. यचात 4 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच काय तर कसोटीत 51 बळी आणि वनडेत 88 बळी घेतली आहेत. 1995 मध्ये त्याने पाकिस्तान विरुद्ध केलेली खेळी कायम क्रिकेटपटूंच्या स्मरणात राहिली आहे. त्याच्या शतकामुळे पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवला होता. . तर न्यूझीलंविरुद्ध 203 धावांची खेळी केली होती. असं असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच घडल्या आहेत. दोन वेळा मृत्यूला चकवा देण्यात गाय व्हिटल यशस्वी झाला आहे.
2013 मध्ये गाय व्हिटल अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला कारणही तसंच होतं. कारण 165 किलो वजनी मगरीसोबत त्याने एक रात्र काढली होती. आठ फूट लांबीची मगर त्याच्या बेडीखाली रात्रभर दबा धरून राहिली होती. पण त्याला याबाबत काहीच माहिती नव्हतं. व्हिटल रात्रभर निश्चिंतपणे बेडवर पडून होता. इतकंच काय बेडखाली पाय टाकून झोपला होता. पण व्हिटलला जेव्हा जाग आली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण बेडखाली इतकी महाकाय मगर पाहून त्याला घाम फुटला. सुदैवाने त्या मगरीने झोपलेल्या असताना हल्ला केला नाही. त्यामुळे गाय व्हिटलला कुठेच दुखापत वगैरे झाली नाही.
गाय व्हिटल 2024 या वर्षात पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात गंभीर जखमी झाला होता. जंगल सफारी दरम्यान एका बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर आणि हातावर खोल जखमा झाल्या. पण त्याचा जीव वाचवण्यासाठी पाळीव कुत्र्याने जोखिम घेतली. त्याच्यामुळे बिबट्याचा हल्ला फसला. जखमी व्हिटलला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हरारे येथील रुग्णालयात दाखल केला. तिथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
