शुबमन गिलच्या कर्णधारपदाची लायकी काढली! इंग्लंडच्या माजी खेळाडूने क्षमतेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

शुबमन गिलकडे वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. टी20 वर्ल्डकपनंतर त्याच्याकडे या फॉर्मेटचं कर्णधारपद येण्याची शक्यता आहे. असं असताना इंग्लंडच्या माजी खेळाडूने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेमकं काय म्हणाला ते जाणून घ्या..

शुबमन गिलच्या कर्णधारपदाची लायकी काढली! इंग्लंडच्या माजी खेळाडूने क्षमतेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
शुबमन गिलच्या कर्णधारपदाची लायकी काढली! इंग्लंडच्या माजी खेळाडूने क्षमतेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 29, 2025 | 7:37 PM

शुबमन गिलच्या क्रिकेट करिअरला सध्या युटर्न लागल्याचं दिसून येत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात मानेला दुखापत झाली. त्यानंतर टी20 मालिकेत कमबॅक झालं. पण काही खास करू शकला नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघातून त्याला डच्चू देण्यात आला. असं असताना इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने शुबमन गिलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शुबमन गिल क्रिकेट सर्व फॉर्मेटचा कर्णधार होण्याच्या योग्य नसल्याचं त्याने सांगितलं. शुबमन गिलमध्ये कर्णधाराकडे असणारा उत्साह काही दिसत नाही. पानेसरने एएनआयशी बोलताना सांगितलं की, गिलमध्ये क्षमतेची काही कमी नाही, पण दबावात त्याचं वागणं काही बरोबर नाही. अशा क्षणी त्याचा बेजबाबदारपणा दिसून येतो. माँटी पानेसरने विराट कोहली आणि शुबमन गिलच्या कर्णधारपदाच फरक असल्याचं देखील सांगितलं.

माँटी पानेसरने पुढे सांगितलं की, विराट कोहलीमध्ये ज्या पद्धतीची ऊर्जा आहे ते पाहता तो दुसऱ्यांपेक्षा वेगळा ठरतो. गिल एक बेजबाबदार क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे खूप सारं टॅलेंट आहे. पण सामन्यात आळशी शॉट खेळतो. विराट कोहलीची क्षमता आणि आक्रमकता सर्व फॉर्मेटमध्ये स्पष्ट दिसते. पण शुबमन गिल असं करू शकत नाही. त्याच्यावर ते खूप ओझं असल्यासारखं आहे. त्यामुळे तो सर्व फॉर्मेटचा कर्णधार होऊ शकत नाही. दरम्यान माँटी पानेसरने टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरबाबतही आपलं मत मांडलं.

‘गौतम गंभीर अजूनही एक प्रशिक्षक म्हणून कसोटी क्रिकेट फॉर्मेटमध्ये स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. गौतम गंभीर व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चांगला प्रशिक्षक आहे. कारण त्यात त्याला यश मिळत आहे. तो रणजी ट्रॉफीत काम करू शकतो आणि देशांतर्गत प्रशिक्षकांशी बोलू शकतो की रेड बॉल क्रिकेटमध्ये टीम कशी बनवली जाते.’, असं माँटी पानेसर गौतम गंभीरबाबत म्हणाला. वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला संघर्ष करावा लागत असल्याचं पानेसरने सांगितलं. भारतीय संघ कसोटीत अजूनही कमकुवत आहे. तीन मोठे खेळाडू निवृत्त झाल्यानंतर संघ बांधण्यासाठी काही वेळ लागतो. सध्या भारतीय खेळाडू कसोटीसाठी तयार नाहीत, असंही तो पुढे म्हणाला.