AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर, IPL दरम्यान टीम इंडियाच्या माजी ओपनरचं निधन

 क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या माजी ओपनरचं निधन झाल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. 

Cricket : क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर, IPL दरम्यान टीम इंडियाच्या माजी ओपनरचं निधन
क्रिकेट खेळताना क्षुल्लक वादातून तरुणाला संपवले
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 05, 2023 | 11:41 PM
Share

मुंबई : क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे माजी ओपनर सुधीर नाईक यांचं अल्पशा आजाराने मुंबईतील रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. बाथरूममधील फरशी डोक्यात पडल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार चालू होते मात्र ते कॉमात गेले होते आणि यामध्येच त्यांचं निधन झालं आहे. सुधीर नाईक यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

भारताने 1974 मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात सुधीर नाईकने लिटल मास्टर ब्लास्टर सुनील गावस्करसोबत सलामीला आले होते. एकदिवसीय सामन्यात भारतासाठी नाईक यांनी पहिला चौकार चार मारला होता. इतकंच नाहीतर 2011 च्या विश्वचषकात नाईक यांनी वानखेडेची खेळपट्टी तयार केली होती.

सुधीर नाईक हे मुंबई क्रिकेट विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आणि रणजी ट्रॉफी विजेते कर्णधार होते. नाईक यांच्या नेतृत्वाखाली संघाने 1970-71 हंगामात रणजी विजेतेपद पटकावलं होतं. 1974 सुधीर नाईक यांनी इंग्लंड दौऱ्यावर बर्मिंगहॅम कसोटीत पदार्पण केलं होतं.

जिथे त्यांनी दुसऱ्या डावात 77 धावा करत आपले एकमेव अर्धशतक झळकावलं हों. नाईक यांनी 85 प्रथम श्रेणी सामने खेळले त्यामध्ये 35 पेक्षा जास्त सरासरीने 4376 धावा केल्या ज्यात दुहेरी शतकासह सात शतकांचा समावेश आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच