AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK WC 2023 | विराटकडून बाबरला सर्वांसमोर टीम इंडियाचं टीशर्ट, अकरम संतापला, म्हणाला…

IND vs PAK WC 2023 | वर्ल्ड कप 2023 मधील भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर मैदानात काय घडलं? वसीम अक्रमने मनातील खदखद बोलून दाखवली. भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानच्या खूपच जिव्हारी लागला

IND vs PAK WC 2023 | विराटकडून बाबरला सर्वांसमोर टीम इंडियाचं टीशर्ट, अकरम संतापला, म्हणाला...
virat kohli t shirt gift to babar azam
| Updated on: Oct 16, 2023 | 9:50 AM
Share

लाहोर : वर्ल्ड कप 2023 मधील भारत-पाकिस्तान या बहुचर्चित सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धची विजयी परंपरा भारताने कायम ठेवली. या मॅचनंतर विराट कोहलीने पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमला एक टीशर्ट गिफ्ट केलं. त्यावर विराट कोहलीची स्वाक्षरी होती. विराट कोहलीच्या या कृतीची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होतेय. भारतीय चाहते याबद्दल कोहलीच कौतुक करतायत. खरंतर ही खूप चांगली गोष्ट आहे. एका क्रिकेटपटूने दुसऱ्या क्रिकेटरला गिफ्ट केलं. पण पाकिस्तानचा माजी कॅप्टन वसीम अक्रमला हे अजिबात आवडलेलं नाही. अक्रमने यावर आपली नाराजी प्रगट केली. भारताकडून मॅच हरल्यानंतर बाबरने मैदानातच कोहलीकडून जर्सीच गिफ्ट स्वीकारलं. अक्रमला हीच गोष्ट आवडली नाही. आज गिफ्ट स्वीकारण्याच दिवस नव्हता, असं अक्रमने म्हटलय.

वसीम अक्रम वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या एक्सपर्ट पॅनलचा भाग आहे. जेव्हा एका पाकिस्तानी चाहत्याने अक्रमला बाबरने कोहलीकडून स्वीकारलेल्या गिफ्टबद्दल प्रश्न विचारला, त्यावर आक्रमने नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने आक्रमला प्रश्न विचारला. “बाबर आजमने विराट कोहलीकडून दोन टी-शर्ट घेतली. प्रत्येक टीव्ही चॅनलने हा व्हिडिओ दाखवला. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने मॅच हरलात, पाकिस्तानी फॅन्स दु:खी आहेत. त्यावेळी ही बाब बाबरने खासगी ठेवायला पाहिजे होती”

‘आज हा दिवस नव्हता’

वसीम अक्रमने सुद्ध फॅनच्या भावनेशी सहमती दाखवली. “आज हा दिवस नव्हता. तुम्ही एक मोठी मॅच गमावल्यानंतर अशा प्रकारे टी-शर्ट स्वीकारण योग्य नाही. जेव्हा मी हे दृश्य पाहिलं, तेव्हा माझी सुद्धा हीच भावना होती. जर तुम्हला असं करायचच होतं, तुम्हाला तुमच्या काकाच्या मुलाने कोहलीच टी-शर्ट आणायला सांगितलं होतं, तर मॅचनंतर तुम्ही ड्रेसिंग रुममध्ये जायला पाहिजे होतं. सार्वजनिकरित्या असं करण्याची गरज नव्हती” असं अक्रम म्हणाला.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.