AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Kmabli video : काय होता अन् काय झाला, विनोद काबंळीला चालताही येईना, Video पाहून सर्वांनाच बसला धक्का

Vinod Kambli Viral Video : टीम इंडियाचा माजी खेळाडू ज्याच्या बॅटींग सचिन तेंडुलकरपेक्षाही दमदार असल्याचं बोललं जात होतं. हा खेळाडू म्हणजे विनोद कांबळी त्याची झालेली अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

Vinod Kmabli video : काय होता अन् काय झाला, विनोद काबंळीला चालताही येईना, Video पाहून सर्वांनाच बसला धक्का
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 06, 2024 | 6:05 PM
Share

भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विनोद कांबळीची या व्हिडीओमधील अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला. विनोद कांबळी याला चालताही येत नसल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्याच्याजवळ असलेली काही लोक त्याला हाताला पकडून बसवत असल्याचं दिसत आहे. एकेकाळी सचिन तेंडुलकरपेक्षा दमदार खेळ असणाऱ्या खेळाडूची झालेली ही अवस्था झाल्याने क्रिकेट चाहतेही आश्चर्यचकित झाले. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

विनोदी कांबळी व्हायरल व्हिडीओमध्ये काय?

एका गाडीच्या बाजूला विनोद कांबळी हा उभा असलेला दिसला. त्यानंतर तो चालण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा पायही पुढे टाकता आला नाही. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एक व्यक्तीने हाथ पकडल्यावर तो पुन्हा चालण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र विनोद कांबळीला तरीसुद्धा चालणं अवघड होऊन जातं. आणखी दोघेजण त्याला पकडतात आणि मदत करतात. परंतु तरीही त्याला चालतचा येत नसल्याने त्याची ती धडपड पाहून क्रिकेट चाहत्यांना वाईटही वाटलं.

विनोद कांबळीचा व्हायरल Video

विनोद कांबळी भारताचा स्टार खेळाडू होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबत शालेय जीवनापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरूवात केली होती. भारतासाठी विनोद कांबळी याने 1991 मध्ये शारजाह येथे पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलेलं. यामध्ये 17 कसोटी सामन्यात 1084 धावा केल्या होत्या. यामध्ये दोन द्विशतक, चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. 227 ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. तर विनोदने 104 वन डे सामन्यात 2477 धावा केल्य असून यामध्ये दोन शतके आणि चौदा अर्धशतकांचा समावेश आहे. तर 106 ही त्याची सर्वोच्चा धावसंख्या आहे.

दरम्यान, विनोद कांबळी याची अशी अवस्था पाहून चाहत्यांना खूप वाईट वाटलं. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट करत कांबळीबाबत दु:ख वाटत असल्याचं म्हटलं आहे. 52 वर्षीय कांबळी यांना यापूर्वीही आरोग्याच्या समस्या होत्या. 2013 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला लीलावती रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला होता.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले