महेंद्रसिंह धोनीच्या पोस्टवर गौतम गंभीरची प्रतिक्रिया, चाहत्यांना विश्वास बसेना असं दिलं उत्तर

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या मैदानात उपस्थित होता. जेतेपदानंतर त्याने गौतम गंभीरचं नाव घेत एक पोस्ट केली. त्यावर आता प्रतिक्रिया आली आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या पोस्टवर गौतम गंभीरची प्रतिक्रिया, चाहत्यांना विश्वास बसेना असं दिलं उत्तर
महेंद्रसिंह धोनीच्या पोस्टवर गौतम गंभीरची प्रतिक्रिया, चाहत्यांना विश्वास बसेना असं दिलं उत्तर
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 09, 2026 | 7:34 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह तिसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला. तर सलग दुसऱ्यांदा आणि होमग्राउंडवर जेतेपद मिळवण्याचा विक्रमही नावावर केला. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला डोकंच वर काढू दिलं नाही. या वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच गौतम गंभीरच्या स्मितहास्यावरही प्रतिक्रिया दिली. त्यावर आता गौतम गंभीरचं उत्तर आलं आहे. गौतम गंभीरची प्रतिक्रिया पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी झालेल्या घटना पाहता दोघांमध्ये वाद असल्याचं चाहत्यांना वाटते. पण गौतम गंभीरने धोनीला दिलेल्या उत्तरामुळे चाहते आवाक् झाले आहेत. चला जाणून घेऊयात महेंद्रसिंह धोनी काय म्हणाला? त्यावर गौतम गंभीरने काय उत्तर दिलं?

महेंद्रसिंह धोनी म्हणाला की…

टीम इंडियाने जेतेपद जिंकताच महेंद्रसिंह धोनी सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आली. महेंद्रसिंह धोनीने लिहिलं की, ‘अहमदाबादमध्ये इतिहास रचला गेला आहे. टीम इंडिया, सपोर्ट स्टाफ आणि भारतीय चाहत्यांचं अभिनंदन. तु्म्हाला खेळताना पाहून खूप आनंद झाला. कोच, तुमचे स्मितहास्य खूप छान दिसते. आक्रमकता आणि हास्य एक किलर कॉम्बो आहे. खरोखरच उत्तम कामगिरी.. मी बुमराहबद्दल काय लिहू कळत नाही. चॅम्पियन गोलंदाज.’ खरं सांगायचं तर या स्पर्धेत गौतम गंभीर कायम चेहऱ्यावरून गंभीर दिसला. पण प्रशिक्षणात त्याने कोणतीच कसर सोडली नाही. या पोस्टवर गौतम गंभीरने उत्तर देत लिहिलं की, ‘हसण्याचे कारण काय असावं! तुम्हाला पाहून छान वाटले.’

गौतम गंभीरच्या प्रशिक्षण कालावधीतील ही दुसरी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर नाव कोरलं होतं. आता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद जिंकलं आहे. आता पुढचं लक्ष्य आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा असणार आहे. या दोन्ही स्पर्धा कठीण परीक्षा असणार आहेत. दरम्यान, गौतम गंभीरने खेळाडू म्हणून 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप जिंकला आहे.

Follow Us