AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Mumbai Indians विरुद्ध मॅचआधी RCB ला झटका, ‘त्या’ तिघांवर खर्च केले 29.5 कोटी रुपये

IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB चा पहिला सामना होणार आहे. त्यांना कडव आव्हान मिळणार हे स्वाभाविक आहे. 1 एप्रिलला दोन्ही टीम्समध्ये पहिला सामना होणार आहे.

IPL 2023 : Mumbai Indians विरुद्ध मॅचआधी RCB ला झटका, 'त्या' तिघांवर खर्च केले 29.5 कोटी रुपये
RCBImage Credit source: instagram
| Updated on: Mar 30, 2023 | 2:30 PM
Share

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सीजनची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. या टुर्नामेंटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम एक एप्रिलला आपला पहिला सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB चा पहिला सामना होणार आहे. त्यांना कडव आव्हान मिळणार हे स्वाभाविक आहे. या मॅचआधी आरसीबीचे तीन खेळाडू पहिल्या मॅचमधून आऊट झाले आहेत. हे तिन्ही प्लेयर्स आरसीबीची ताकत आहेत. फ्रेंचायजीने त्यांच्यावर 29.5 कोटी रुपये खर्च केले आहेत.

ग्लेन मॅक्सवेल, जोश हेजलवुड आणि वानेंदु हसारंगा आरसीबीकडून पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाहीत. हेजलवूड आणि हसारंगा आणखी काही सामन्यांना मुकू शकतात. असं का होतय? ते जाणून घ्या.

मॅक्सवेल बाहेर का?

ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे फिट नाहीय. मागच्यावर्षी एका बर्थ डे पार्टीमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या पायावर ऑपरेशन झालं. मॅक्सवेलने अलीकडेच भारताविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये पुनरागमन केलं. पण त्यावेळी तो पूर्णपणे फिट नसल्याचं लक्षात आलं. मॅक्सवेल आरसीबीच्या कॅम्पमध्ये स्वत:ला 100 टक्के फिट बनवण्याचा प्रयत्न करतोय. ग्लेन मॅक्सवेलची सॅलरी 11 कोटी रुपये आहे.

प्रमुख गोलंदाज नाही खेळणार

आरसीबीच्या गोलंदाजीचा कणा असलेला जोश हेजलवूड सुद्धा काही सामन्यात खेळणार नाहीय. हेजलवूड अजूनपर्यंत भारताल आलेला नाही. हेजलवुडच्या दुखापतीमध्ये वेगाने सुधारणा होत आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिके दरम्यान हेजलवूडला दुखापत झाली होती. बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्येही तो खेळू शकला नाही. हेजलवूडला आरसीबीने 7.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलय. या खेळाडूच काही सामन्यात न खेळणं आरसीबीला महाग पडू शकतं. वानेंदु हसारंगा 3 मॅचना मुकणार?

लेग स्पिनर वानेंदु हसारंगा सुद्धा काही सामन्यात खेळणार नाही. 10.75 कोटींना विकत घेतलेला हा खेळाडू न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीज खेळतोय. त्यानंतर तो टी 20 सीरीज खेळणार आहे. श्रीलंकेची ही सीरीज 8 एप्रिलला संपणार आहे. आरसीबीचा दुसरा सामना 6 एप्रिलला होणार आहे. 10 एप्रिलला तिसरा सामना आहे. या तिन्ही सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू