अहमदाबाद : IPL 2023 सीजनमधला दुसरा क्वालिफायर सामना आज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीम्समध्ये क्वालिफायर 2 ची मॅच होईल. आजच्या मॅचमधील विजेता संघ फायनलमध्ये दाखल होईल. त्यांचा सामना CSK विरुद्ध होईल. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ची टीम आधीच फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यांनी क्वालिफायर 1 च्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.