AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs MI Qualifier 2 | रोहित शर्माकडून पराभवाचं खापर कुणावर? हिटमॅन संतापला? पाहा व्हीडिओत

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातही अपयशी ठरला. मात्र रोहितने मुंबई इंडियन्सच्या पराभवाला कोणाला जबाबदार धरलं? पाहा व्हीडिओ.

GT vs MI Qualifier 2 | रोहित शर्माकडून पराभवाचं खापर कुणावर? हिटमॅन संतापला? पाहा व्हीडिओत
| Updated on: May 27, 2023 | 2:19 AM
Share

अहमदाबाद | गुजरात टायन्सने आयपीएल क्वालिफायर 2 सान्यात मुंबई इंडियन्सवर 62 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. गुजरातने या विजयासह आयपीएल फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा धडक मारली आहे. आता आयपीएल ट्रॉफीसाठी गुजरा टायटन्सचा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना होणार आहे. गुजरातने मुंबईला विजयासाठी शुबमन गिल याच्या 129 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 234 रन्सचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबई इंडियन्सची पलटण अवघ्या 18.2 ओव्हरमध्ये 171 धावांवरच फुस्स झाली आहे.

मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिलक वर्माने तोडफोड करत 43 धावा केल्या. कॅमरुन ग्रीनने 30 रन्स जोडल्या. मात्र इतर कुणालाही काहीच करता आलं नाही. इशान किशन याला सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे कनक्शन नियमानुसार त्याच्या जागी विष्णू विनोदचा समावेश करण्यात आला. मुंबईला इशान किशन न खेळल्याचा मोठा फटका बसला.

मुंबईचा या पराभवासह या मोसमातील प्रवास इथेच संपला. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा याने पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. रोहितने या सामन्याचं खापर कुणावर फोडलं, सामन्याबाबत तो काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्माने पोस्ट मॅच प्रोडक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. रोहितने शतकवीर शुबमन गिल याचं कौतुक केलं. रोहितने या कौतुकासह शुबमनला चिमटा ही काढला. रोहित नक्की काय म्हणाला पाहुयात.

“इशान किशन याचं तडकाफडकी कनक्शमुळे बाहेर पडल्याने टीमला मोठा झटका लागला. मात्र आपल्याला अशा गोष्टींसाठी तयार असायला हवं. तसंच याबाबतीत फार विचार करायला नको. या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणं ही आमच्यासाठी मोठी बाब होती”, असं रोहितने स्पष्ट केलं.

” 234 धावांचं एक चांगलं असं आव्हान होतं. शुबमनने फार चांगली बॅटिंग केली. खेळपट्टी चांगली होती. गुजरातने आमच्यासाठी 25 धावा अधिक केल्या. कॅमरुन ग्रीन आणि सूर्यकुमार या दोघांची चांगली बॅटिंग केली, मात्र आम्ही भरकटलो. पावरप्ले दरम्यान विकेट्स गमावल्याने आम्हाला अपेक्षित वेग कायम ठेवता आला नाही. आम्ही फक्त एक भागीदारी करण्यात अपयशी ठरलो. तसेच शुबमनसारखी बॅटिंग कुणीतरी करायची गरज होती. गुजरात चांगली खेळली”, असं म्हणत रोहितने गुजरातचं कौतुक केलं.

रोहित शर्मा पलटणच्या पराभवानंतर म्हणाला….

शुबमनला रोहितचा चिमटा

रोहितने शुबमनचं कौतुकचं केलं नाही, तर चिमटाही काढला. “शुबमन या संपूर्ण हंगामात चांगला खेळला. आता काही दिवसांवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आहे. शुबमन तिथेही असाच खेळेल”असं हसत हसत म्हणत रोहितने शुबमनला चिमटा काढला.

रोहित शुबमनबाबत काय म्हणाला?

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), विष्णू विनोद (कनकशन सब्स्टीट्यूट), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...