GT vs RR Qualifier 2 : गुजरातकडे फायनलमध्ये पोहचण्याची आणखी 1 संधी, राजस्थान विरुद्ध जिंकणार?
IPL 2026 GT vs RR Qualifier 2: गुजरात टायटन्सकडे क्वालिफायर 1 सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये सुरक्षितरित्या पोहचण्याची संधी होती. मात्र गुजरातने ही संधी गमावली.

IPL 2026 GT vs RR
Image Credit source: Bcci
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शुक्रवारी 29 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर 2 सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे राजस्थान आणि गुजरात दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. तर दुसऱ्या बाजूला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आधीच फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे क्वालिफायर 2 सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो याकडे आरसीबी आणि क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. राजस्थानने हा सामना जिंकल्यास त्यांची अंतिम फेरीत पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरेल. राजस्थान याआधी 2008 आणि 2022 साली फायनलमध्ये पोहचली आहे.
Follow Us