GT Captain IPL 2024 : हार्दिक पंड्याच्या मुंबईत जाण्याने या खेळाडूला लॉटरी, कॅप्टनसीची माळ पडली गळ्यात

Gujrat Titans News Captain : आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याला मुंबईने आपल्या ताफ्या घेतलं असून आता गुजरातच्या कर्णधारपदी कोण असा सवाल सर्वांना पडला होता. गुजरातने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.

GT Captain IPL 2024 : हार्दिक पंड्याच्या मुंबईत जाण्याने या खेळाडूला लॉटरी, कॅप्टनसीची माळ पडली गळ्यात
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 3:44 PM

मुंबई : आयपीएल 2024 सीझन सुरू होण्याआधीच मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला आहे. गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्त्वा  केलेल्या हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी 15 कोटी रूपये मोजले आहेत. संघाचा कर्णधारच ट्रेडिंगमध्ये गेल्याने गुजरात संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.

कोण आहे गुजरातचा नवीन कॅप्टन?

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पंड्या गेल्याने गुजरात संघाने आपला नवीन कर्णधार म्हणून शुबमन गिल याची नियुक्ती केली आहे. शुबमन गिल याने गुजरातसाठी दमदार कमगिरी केली असून यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा ऑरेंज कॅप जिंकली होती. शुबमन याने 17 सामन्यांमध्ये 890 धावा केल्या होत्या.

2018 साली शुबमनने केकेआर संघाकडून पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 91 सामन्यांमध्ये त्याने 2790 धावा केल्या असून यामध्ये 3 शतके 18 अर्धशतके केली आहेत. मात्र कोलकाता संघाने शुबमन गिलला रिलीज केलं होतं. त्यानंतर गुजरातने त्याला लिलावाआधी 8 कोटी रूपयांमध्ये खरेदी केलं होतं.

वर्ल्ड कपमध्ये इतकी काही खास कामगिरी केली नसली तरी शुबमन एक क्लास खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक त्यासोबतच वनडे मध्ये पठ्ठ्याने द्विशतक केलं आहे. न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाविरूद्ध त्याने 208 धावा केल्या होत्या.

शुबमन गिल तरूण असून त्याच्याकडे संघाचं कर्णधारपद गेल्याने सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. कारण संघात अनेक सीनिअर खेळाडू आहेत. केन विलियमसन याच्याकडे कॅप्टनसी जाईल असं सर्वांना वाटलं होतं पण टीम मॅनेजमेंटने भविष्याचा विचार करत गिलकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.