GT vs RR Qualifier 2 Live Streaming : गुजरात विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 साठी सज्ज, सामना किती वाजता? जाणून घ्या
Gujarat Titans vs Rajasthan Royals Qualifier 2 IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांकडे अंतिम फेरीत पोहचण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ फायनलचं तिकीट फायनल करणार आणि ट्रॉफीवर 1 हात ठेवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? याचं उत्तर क्रिकेट चाहत्यांना येत्या काही तासांतच मिळणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वालिफायर 2 सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने 2 युवा भारतीय कर्णधार आमनेसामने असणार आहेत. शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे. तर रियान पराग याच्या खांद्यावर राजस्थानच रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. आता दोघांपैकी कोणता संघ फायनलमध्ये पोहचणार? याची उत्सूकचा चाहत्यांना लागून आहे. या निमित्ताने सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना कधी?
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना शुक्रवारी 29 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना कुठे?
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/series/ipl या लिंकवरील लाईव्ह ब्लॉगद्वारे सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.