AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harbhajan Singh निवृत्तीच्या तयारीत, IPL टीमकडून कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होण्याची ऑफर

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh) पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफचा महत्त्वाचा सदस्य म्हणून दिसेल.

Harbhajan Singh निवृत्तीच्या तयारीत, IPL टीमकडून कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होण्याची ऑफर
Harbhajan Singh
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 5:48 PM
Share

मुंबई : भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh) पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफचा महत्त्वाचा सदस्य म्हणून दिसेल. मागील आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात, 41 वर्षीय हरभजन कोलकाता नाईट रायडर्सकडून काही सामने खेळला, मात्र स्पर्धेच्या यूएई मध्ये खेळवण्यात आलेल्या टप्प्यात तो एकही सामना खेळला नाही. हरभजन पुढील आठवड्यात क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करेल आणि त्यानंतर तो काही आयपीएल फ्रेंचायझींच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होण्याच्या ऑफरपैकी एक ऑफर स्वीकारेल अशी अपेक्षा आहे. (Harbhajan Singh to retire from cricket, will seen in coaching role with an IPL team)

आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “ही भूमिका मार्गदर्शक सल्लागार किंवा सल्लागार गटाचा भाग असू शकते. परंतु तो ज्या फ्रेंचायझीच्या संपर्कात आहे त्यांना त्याचा अनुभव वापरायचा आहे.” लिलावात खेळाडूंची निवड करण्यात फ्रँचायझीला मदत करण्यातही तो सक्रिय भूमिका बजावेल. हरभजन सिंग आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे. त्यापैकी मुंबई आणि चेन्नईकडून खेळताना त्याने विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल 2021 मध्ये KKR सोबत त्याला ट्रॉफी जिंकण्याची संधी होती पण संघ अंतिम फेरीत पराभूत झाला. त्याने आयपीएलमध्ये 163 सामने खेळले असून त्यात 150 विकेट घेतल्या आहेत. 18 धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच त्याने 833 धावा जमवल्या आहेत.

वरुण चक्रवर्तीचा मार्गदर्शक

हरभजनने नव्या खेळाडूंना तयार करण्यात स्वारस्य दाखवले आहे. गेल्या वर्षी केकेआरसोबतच्या सहवासात हरभजनने वरुण चक्रवर्तीला मार्गदर्शन करण्यात बराच वेळ घालवला. आयपीएलच्या मागील हंगामात केकेआरने शोधलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या व्यंकटेश अय्यरने यापूर्वी खुलासा केला आहे की, हरभजनने काही नेट सत्रांनंतर व्यंकटेशला सांगितले होते की, तो या लीगमध्ये यशस्वी होईल. विशेष म्हणजे तोवर व्यंकटेश एकही आयपीएल सामना खेळला नव्हता.

गेल्या मोसमातही केकेआरचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम आणि कर्णधार ओईन मॉर्गन यांनी संघ निवडीच्या बाबतीत हरभजनच्या सल्ल्यांचे पालन केले. सूत्राने सांगितले की, “हरभजनला लवकरच निवृत्तीची औपचारिक घोषणा करायची आहे. त्याने एका फ्रेंचायझीशी सविस्तरपणे चर्चा केली आहे. फ्रेंचायझीच्या ऑफरमध्ये त्याने स्वारस्य दाखवले आहे. परंतु कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरच तो याबद्दल व्यक्त होईल.

इतर बातम्या

MS Dhoni Yuvraj Singh Reunion : अनेक वर्षांनंतर धोनी-युवराजची भेट, फोटो व्हायरल

IND VS SA : ‘अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवालला पहिल्या कसोटीत स्थान नाही, हनुमा विहारीला संधी’

Photos | मॉडलिंगच्या क्षेत्रात सारा तेंडुलकरचा डेब्यू, पाहा सचिनच्या मुलीचा नवीन अवतार

(Harbhajan Singh to retire from cricket, will seen in coaching role with an IPL team)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.